AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त एका सीनमुळे अभिनेत्याने नाकारली आदित्य धरची ऑफर, लेकीच्या हट्टाने पालटलं नशीब

फिल्म इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत थक्क करणारा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की एका ब्लॉकबस्टर चित्रपटात फक्त एकाच सीनची ऑफर दिल्याने त्यांनी तो करण्यास नकार दिला होता.

| Updated on: Apr 21, 2026 | 11:31 AM
Share
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांच्या जबरदस्त यशाने ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांच्या करिअरला नवीन वळण मिळालं आहे. यामध्ये जमील जमालीची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. परंतु फार कमी लोकांना माहीत असेल की राकेश बेदी यांनी आदित्यचा पहिला चित्रपट 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' जवळपास आधी नाकारला होता.

1 / 6
ही गोष्ट 2019 मधली आहे, जेव्हा आदित्य धर त्याच्या 'उरी' या चित्रपटातील एका छोट्या भूमिकेसाठी राकेश बेदींकडे गेला होता. त्यावेळी राकेश बेदींचं चित्रपटात काम करण्याच मन नव्हतं. आता दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानच्या व्लॉगमध्ये गप्पा मारताना त्यांनी हा किस्सा सांगितला. "मी त्याला उरीसाठी नकार दिला होता, कारण त्यात सर्बियामधील फक्त एकच सीन होता", असं ते म्हणाले.

2 / 6
राकेश यांनी मुलगी रितिकाकडे इशारा करत पुढे म्हणाले, "लेकीने हट्ट केला की बाबा, ते नवीन दिग्दर्शक आहेत आणि प्रतिभावान आहेत. कृपया हा चित्रपट स्वीकारा. मग माझ्या पत्नीनेही मला समजावलं की नवीन दिग्दर्शकांसोबत काम करण्यास नकार दिला, तर त्यांच्यावर हा अन्याय असेल."

3 / 6
रितिकाच्या मते असं केल्यास नवीन लोकांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधीच मिळणार नाही. मुलीने समजावून सांगितल्यानंतर राकेश बेदी यांनी आदित्यला होकार दिला. हे ऐकून रितिका मस्करीत म्हणते, "म्हणून मी आईवडिलांना सांगते की आमच्यासारख्या तरुणांचं ऐका, फायद्यात राहाल."

4 / 6
रितिकाला या गोष्टीसाठी बक्षीस मिळालं पाहिजे, असं फराह खान म्हणाली. तेव्हा लगेच रितिका म्हणते, "बक्षीस तर पहिल्यापासून निश्चित आहे. मला लवकरच रेंज रोव्हर गाडी मिळणार आहे." हे ऐकून फराह खान चकीत होते. तेव्हा राकेश बेदी आणि त्यांची पत्नी हसून या गोष्टीला नकार देतात.

5 / 6
राकेश बेदी यांनी 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक'मध्ये एका अशा आयएसआय एजंटची भूमिका साकारली होती, जो खरंतर रॉ साठी काम करत असतो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. आता 'धुरंधर' आणि 'धुरंध 2' या दोन्ही चित्रपटांमधील राकेश बेदींच्या भूमिकेवर भरभरून कौतुकाचा वर्षाव झाला.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...