Dhurandhar 2: बादलीभर रक्त, भीषण ऊन, तापलेले कंटेनर्स.. ‘धुरंधर 2’चा क्लायमॅक्स कसा शूट झाला?

'धुरंधर : द रिव्हेंज'चा क्लायमॅक्स सीन तुम्ही पाहिला असेल, तर त्यात अॅक्शन सीन्सचा पुरेपूर भरणा आहे. लुधियानामध्ये या क्लायमॅक्सचं शूटिंग पार पडलं होतं. त्यासाठी टीमने नेमकी कशी तयारी केली आणि कोणकोणत्या अडचणी आल्या, याविषयी मेकअप आर्टिस्टने सांगितलं.

| Updated on: Apr 06, 2026 | 2:07 PM
1 / 5
'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाचा मेकअप आणि प्रोस्थेटिक आर्टिस्ट करणदीप सिंहने क्लायमॅक्सच्या शूटिंगबद्दल बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. हा क्लायमॅक्स कसा शूट झाला, त्यात कोणकोणत्या अडचणी आल्या, याविषयी त्याने सांगितलं आहे.

'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाचा मेकअप आणि प्रोस्थेटिक आर्टिस्ट करणदीप सिंहने क्लायमॅक्सच्या शूटिंगबद्दल बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. हा क्लायमॅक्स कसा शूट झाला, त्यात कोणकोणत्या अडचणी आल्या, याविषयी त्याने सांगितलं आहे.

2 / 5

करणदीप सिंहने एका मुलाखतीत सांगितलं की, 'धुरंधर 2'चा क्लायमॅक्स शूट करण्यासाठी टीमला जवळपास 15 ते 20 दिवस लागले. रणवीर सिंहला जाड लेदर जॅकेट आणि विग घालून शूटिंग पूर्ण करावी लागली होती. त्यावेळी तिथे तापमान 48 डिग्री होतं.

3 / 5

'एनडी टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत करणदीपने सांगितलं की, "धुरंधर 2 चा क्लायमॅक्स लुधियानाच्या बाहेरील परिसरात शूट झाला होता. हे शूटिंग 15-20 दिवस चाललं होतं आणि त्यावेळी तापमान 48 डिग्री होतं. तिथे आसपास झाडं किंवा सावली मिळेल अशी कोणतीच जागा नव्हती, त्यामुळे शूटिंग करणं खूप कठीण होतं."

4 / 5

"आजूबाजूला मेटलचे मोठमोठे कंटेनर्स होते आणि उन्हात ते तापत होते. मालगाड्या आणि गाड्यासुद्धा होत्या, त्यासुद्धा तापल्या होत्या. रणवीरला त्या भीषण उन्हात जाड लेदर जॅकेट आणि विग घालून कंटेनर्सवर उडी मारायची होती, जे आधीपासून खूप तापलेले होते", असं तो पुढे म्हणाला.

5 / 5

क्लायमॅक्सच्या एक आठवड्याच्या शूटिंगदरम्यान जवळपास एक बादली रक्ताचा वापर करण्यात आला होता. अर्थात ते खरं रक्त नव्हतं, फक्त शूटिंगसाठी तयार करण्यात आलेला रंग होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us