
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त अभिनेते झाले. 80 च्या दशकात अनेक प्रतिभावान कलाकार बॉलिवूडमध्ये आले. यात काही कलाकार इंडस्ट्रीचा भाग आहेत. यात एक कलाकाराने धुरंधरमध्ये जबरदस्त काम केलय.

आम्ही बोलतोय अभिनेता राकेश बेदीबद्दल. मागच्या साडेचार दशकापासून राकेश बेदी फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहे. अनेक टीव्ही सीरियल्समध्ये त्यांनी काम केलय. उरी फिल्ममध्ये आदित्य धरने त्यांना छोटासा रोल दिलेला. तो त्यांनी खूप प्रभावी पद्धतीने साकारला. आता धुरंधर चित्रपटात त्यांना खास रोल मिळालाय.

चित्रपटात ते जमील नावाच्या राजकीय नेत्याच्या रोलमध्ये आहेत. फिल्ममध्ये त्यांचा स्क्रीन टाइम सुद्धा जास्त आहे. चित्रपटात महत्वाची भूमिका आहे. पुढच्या पार्टमध्ये त्यांचा रोल जास्त असू शकतो. त्यांनी स्वत: मीडियाशी बोलताना सांगितलं.

फिल्ममध्ये राकेश बेदींच्या मुलीचा रोल सारा अर्जुनने केलाय. फिल्ममध्ये रणवीर सिंहचा रोल हामजा अली मजारीचा आहे. तो सारा अर्जुनशी निकाह करतो. पहिल्या पार्टमध्ये अक्षय खन्नाचं कॅरेक्टर रहमान डकैतचं निधन झालं. दुसरा पार्ट 19 मार्च 2026 ला रिलीज होणार आहे.

राकेश बेदीने राजकीय नेत्याचा रोल खूप सुंदररित्या साकारला आहे. त्यांचं कॅरेक्टर प्रेक्षकांना खूप आवडलं. एका सीरियस स्पाय चित्रपटात विनोदी अंग टाकण्याचं काम राकेश बेदीने केलय. ते एक उच्च क्षमता असलेले अभिनेते आहेत.