
बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्या आयुष्यात बराच काळ गोंधळ सुरू होता. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की दोघेही घटस्फोट घेणार आहेत. पण या सर्व अफवा असल्याचे सुनीताने सांगितले. दरम्यान, गोविंदाचे एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचेही बोलले जात होते. चला जाणून घेऊया त्याविषयी...

गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात इतर जोडप्यांप्रमाणेच चढ-उतार येत राहिले आहेत. जेव्हा गोविंदाने सुनीताशी साखरपुडा मोडला होता तेव्हाही तो एका अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता आणि तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने साखरपुडा तोडला होता.

गोविंदा ज्या अभिनेत्रीच्या प्रेमात होता, तिच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण त्याचे तेव्हाचे अफेअर आताच्या घटस्फोटाच्या चर्चांशी देखील जोडले गेले होते.

गोविंदा त्याच्या बॉलिवूड करिअरच्या सुरुवातीच्या काळात मराठमोळी अभिनेत्री नीलम कोठारीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. याची कबुली त्याने स्वतः 1990 मध्ये स्टारडस्ट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली होती.

अभिनेत्याने सांगितले होते, “जितके मी तिला (नीलम कोठारी) ओळखत गेलो, तितकी ती मला आवडत गेली. ती अशी स्त्री होती, जिच्यावर कोणताही पुरुष फिदा होईल.”

असे म्हटले जाते की, जेव्हा गोविंदाने सुनीताशी साखरपुडा केला होता तेव्हा तो नीलमसोबतही रिलेशनशिपमध्ये होता. त्याने आपल्या साखरपुड्याची गोष्ट नीलमपासून लपवून ठेवली होती. नंतर अभिनेत्याने नीलमशी लग्न करण्यासाठी सुनीताशी साखरपुडा तोडला होता. पण, नंतर त्याचे लग्न सुनीताशीच झाले.

गोविंदाने नंतर सुनीताशीच लग्न केले आणि तिच्यासोबत संसार थाटला. या जोडप्याच्या लग्नाला 38 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघे 1987 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. आता दोघे दोन मुलांचे पालक आहेत. या जोडप्याला एक मुलगी टीना आहूजा आणि एक मुलगा यशवर्धन आहूजा आहे.