Old Song: चक्क सिनेमाच्या टाटयल ट्रॅकचे 21 व्हर्जन, 25 वर्षे जुन्या या गाण्याची आजही क्रेझ
Old Song: 25 वर्षांपूर्वी एक सिनेमा असा आला होता ज्याच्या टायटल ट्रॅकचे 21 व्हर्जन रेकॉर्ड करण्यात आले होते. मात्र, सर्वात आधी आणि अतिशय रफ जे रेकॉर्ड केले तेच प्रसिद्ध झाले. आजही अनेकजण ते गुणगुणताना दिसतात.

आजही लोकप्रिय असलेल्या अनेक जुन्या गाण्यांपैकी एक २५ वर्षे जुने गाणे विशेष उल्लेखनीय आहे. ते त्या काळात खूप गाजले आणि कॉलेज तरुणांमध्ये प्रचंड फेमस झाले. या गाण्याचे एक-दोन नव्हे तर तब्बल २१ मिक्स तयार करण्यात आले. तरीही मूळ गाणेच सर्वाधिक हिट ठरले.
हे एका चित्रपटाचे टायटल ट्रॅक आहे. मूळ गाणे शंकर महादेवन यांनी गायले होते. या गाण्याशी संबंधित किस्सा त्यांनीच सांगितला होता. ते म्हणाले की, त्यांनी सहकारी संगीतकार एहसान नूरानी आणि लॉय मेंडोन्सा तसेच साउंड इंजिनिअर विजय बेनेगल (बेनी) यांच्यासोबत मिळून या गाण्याच्या २१ वेगवेगळ्या आवृत्त्या तयार केल्या होत्या. पण शेवटी गाण्याची मूळ किंवा कच्ची आवृत्तीच चित्रपटात ठेवण्यात आली. कारण तीच निर्माते आणि संपूर्ण टीमला सर्वाधिक आवडली होती.
स्पॉटिफायसाठी बनवलेल्या एका विशेष व्हिडिओमध्ये शंकर महादेवन म्हणाले, “बेनीने या गाण्याचे सुमारे २१ मिक्स तयार केले, पण तुम्ही जे ऐकत आहात तो रफ मिक्स आहे. तो आम्ही तयार केलेला पहिला स्क्रॅच आहे. त्यात काहीतरी जादू होती. त्यात बेस लाइन्स आणि इतर घटक होते. आमच्याकडे काही नवीन सॅम्पल्स आणि उत्तम ड्रम्स होते. आम्ही प्रयोग केले आणि ते यशस्वी झाले. लोक कमीत कमी साधनांसह काम करायला घाबरतात.”
त्यांनी पुढे सांगितले की, संगीतात बहुतेक लोकांना एका गाण्यात खूप जास्त गोष्टी भरायच्या असतात. त्यांच्या मते, जर तुम्हाला तुमच्या मेलोडी, ग्रूव्ह आणि बेस लाइनवर विश्वास असेल, तर तुम्हाला जास्त गोष्टींची गरज नसते. एक चांगला साउंड इंजिनिअर मिक्सिंगद्वारे प्रभावीपणे उणीवा भरून काढू शकतो.
आमिर खानच्या २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल चाहता है’ चित्रपटाचे हे टायटल ट्रॅक आहे. उदित नारायण, अलका याज्ञिक, कॅरालिसा मॉन्टेरो, श्रीनिवास, शान, कविता कृष्णमूर्ती, महादेवन, क्लिंटन सेरेजो, केके हार्वे आणि सोनू निगम यांसारख्या प्रसिद्ध गायकांनी गायलेल्या चित्रपटातील गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. रॉक, पॉप आणि भारतीय संगीताचा मिलाफ असलेले चित्रपटाचे संगीत खूप लोकप्रिय झाले.