
कोरोना संसर्गाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला आहे. कोरोना झालेल्यांनी काय काय खावे याची पूर्ण लिस्टच हर्षवर्धन यांनी जारी केली आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास घाबरून जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. योग करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार घ्या. त्यामुळे कोविडचा सामना करण्यास मदत मिळेल, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

डार्क चाॅकलेट

ओट्स

प्रोटीनसाठी चिकन, मासे, अंडी, पनीर, सोया आणि नट्सचं सेवन करण्याचा सल्लाही आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

शिवाय नियमित योग आणि प्राणायाम करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच तणावापासून दूर राहण्यासाठी 70 टक्के कोको असलेलं डार्क चॉकलेटचंही सेवन करा. तसेच इम्युनिटी वाढवण्यासाठी हळदीयुक्त दूध प्या, असा सल्लाही देण्यात आला आहे.