
पंजाबी गायक दिलजीत दोसांजच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. गायकाला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी त्याच्या कार्यक्रमात चाहत्यांची मोठी गर्दी जमते. पण आता दिलजीत याच्या कार्यक्रमाला विरोध होताना पाहायला मिळाला...

दिलजीत दोसांझ याच्या कार्यक्रमामुळे कोथरूडमधील वाहतूक व्यवस्थेचा फज्जा उडाला. सुरक्षिततेचा प्रश्न तथा कर्णकर्कश आवाजामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने कार्यक्रम रद्द करावा,अशी भूमिका कोथरूडमधील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेतली....

दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमामुळे स्थानिक नागरिकांना कोंडी आणि डीजेच्या आवाजामुळे प्रचंड मानसिक त्रास देखील सहन करावा लागला

पौड रस्त्यावर वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. अंतर्गत रस्तेही वाहतूक कोंडीत अडकले.

एवढंच नाही तर, या वेळी पोलिसांची दमछाक नागरिकांनाही पाच मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले...