
बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे अजूनही प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतात. मोठा चाहता वर्ग हा अमिताभ बच्चन यांचा आहे.

आज अमिताभ बच्चन हे कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत. विशेष म्हणजे एक आलिशान आयुष्य अमिताभ बच्चन जगतात. फक्त मुंबई किंवा भारतच नाही तर विदेशातही मोठी संपत्ती ही अमिताभ बच्चन यांची आहे.

अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यामध्ये एक असा वाईट काळ आला होता की, ते कर्जबाजारी झाले होते. लोक त्यांच्या घरी सतत पैशांची मागणी करण्यासाठी यायचे. इतकेच नाही तर पैशांसाठी त्यांना थेट शिव्या द्यायचे.

