Photo : अंबानींच्या अँटिलिया बंगल्यात शाही मेजवणी, डायनिंग टेबल पाहून थक्क व्हाल; पहिल्यांदाच फोटो समोर
या पार्टीतील सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट म्हणजे खास पद्धतीने डिनर टेबल तयार करण्यात आला होता. या टेबलला नदीच्या प्रवाहासाराखा वळणदार आकार देण्यात आला होता. टेबलवर फुलांच्या प्रिंटचे पांढरे कापड अंथरले होते.

मुकेश आणि नीता अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांनी प्रसिद्ध फॅशन डिझायनर टोरी बर्च यांच्या स्वागतासाठी मुंबईतील अँटिलिया निवासस्थानी खास डिनर पार्टीचे आयोजन केले होते. या शानदार पार्टीला अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली. मात्र, पाहुण्यांपेक्षा घरातील शाही सजावट अधिक चर्चेचा विषय ठरली.
पार्टीसाठी संपूर्ण हॉलची सजावट एखाद्या सुंदर बागेसारखी करण्यात आली होती. गुलाबी, जांभळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या ताज्या फुलांसह हिरव्या पानांचा वापर करण्यात आला होता. फुलांची आकर्षक मांडणी आणि मंद प्रकाशामुळे संपूर्ण परिसराला एक वेगळेच रुप आले होते.
या पार्टीतील सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट म्हणजे खास पद्धतीने डिनर टेबल तयार करण्यात आला होता. या टेबलला नदीच्या प्रवाहासाराखा वळणदार आकार देण्यात आला होता. टेबलवर फुलांच्या प्रिंटचे पांढरे कापड अंथरले होते.
डिनर टेबलच्या मध्यभागी गुलाबी, जांभळ्या आणि पांढऱ्या ताज्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. काचेच्या होल्डरमध्ये गडद हिरव्या मेणबत्त्या आणि क्रिस्टल स्टँडवरील पांढऱ्या मेणबत्त्या ठेवलेल्या होत्या.
हॉलच्या छताला लावण्यात आलेले भव्य क्रिस्टल झुंबर या संपूर्ण सजावटीचे मुख्य आकर्षण ठरले. चमचम करणारे झुंबर पाहून डोळे दिपत होते. या मेजवानीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. (फोटो सौजन्य- instagram- Anaita Shroff Adajania, TORY BURCH)