कॅन्सरवरील उपचारांदरम्यान दीपिकाची अशी अवस्था; साइड इफेक्ट्सचा सामना करून खचली अभिनेत्री

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करवर सध्या इम्युनोथेरपी सुरू आहे. गेल्या वर्षी तिला दुसऱ्या स्टेजच्या लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आता इम्युनोथेरपीचे साइड इफेक्ट्स काय होत आहेत, याबद्दल तिने खुलासा केला आहे.

| Updated on: Jul 09, 2026 | 2:05 PM
1 / 5
'ससुराल सिमर का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करत आहे. दीपिकाला गेल्या वर्षी लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता तिने जून महिन्यापासून इम्युनोथेरपीचे सेशन्स सुरू केले आहेत.

'ससुराल सिमर का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या विविध समस्यांचा सामना करत आहे. दीपिकाला गेल्या वर्षी लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता तिने जून महिन्यापासून इम्युनोथेरपीचे सेशन्स सुरू केले आहेत.

2 / 5

गेल्या महिन्यात दीपिकाच्या इम्युनोथेरपीचा पहिला सेशन पूर्ण झाला होता. जर 2 जुलै रोजी दुसरा सेशन पार पडला. आता युट्यूबवर व्लॉग पोस्ट करत दीपिकाने तिच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. इम्युनोथेरपीचे साइड इफेक्ट्स जाणवत असल्याचा खुलासा तिने केला आहे.

3 / 5

"मागचा संपूर्ण महिना अक्षरश: वेडं करणारा होता. पहिल्या इम्युनोथेरपीनंतर माझ्या शरीरात त्याचे साइड इफेक्ट्स दिसू लागले. आधी मला ताप आला आणि दुसऱ्या सेशननंतर शरीरावर रॅशेस येऊ लागले होते. सतत खाज येत होत होती. या बदलांची मी आता सवय करून घेत आहे", असं ती म्हणाली.

4 / 5

याविषयी ती पुढे म्हणाली, "दुसरं सेशन पूर्ण होऊन तीन-चार दिवस झाले आहेत आणि मी साइड इफेक्ट्सचा सामना करतेय. मी मजबूत राहण्याचा प्रयत्न करतेय. मी जेव्हा दुसऱ्या सेशनसाठी जात होती, तेव्हा माझा मुलगा रुहान खूप निराश झाला होता. त्याला पाहून मी फार दु:खी होती."

5 / 5

दीपिकाने अभिनेता शोएब इब्राहिमशी लग्न केलं असून या दोघांना रुहान हा मुलगा आहे. आरोग्याच्या या कठीण समस्यांचा सामना करताना शोएबने दीपिकाची खंबीर साथ दिली आहे. युट्यूबवरील व्लॉगद्वारे दोघं त्यांच्या खासगी आयुष्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us