या दिग्दर्शकाने बनवला फक्त 1 चित्रपट, जिंकला नॅशनल अवार्ड पण हातात येण्याआधीच झाला मृत्यू

बॉलिवूडमधील 34 वर्षांचा दिग्दर्शक ज्याने फक्त बनवला एकच चित्रपट. ज्या दिवशी मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्याच दिवशी झाला मृत्यू.

| Updated on: Feb 21, 2026 | 11:52 AM
1 / 6
चित्रपटसृष्टीच्या झगमगत्या दुनियेत काही कलाकार फार काळ झळकत नाहीत मात्र तेच कलाकार आपल्या कामातून अशी ओळख निर्माण करून जातात की दशकानुदशके त्यांचा आवाज घुमत राहतो.

चित्रपटसृष्टीच्या झगमगत्या दुनियेत काही कलाकार फार काळ झळकत नाहीत मात्र तेच कलाकार आपल्या कामातून अशी ओळख निर्माण करून जातात की दशकानुदशके त्यांचा आवाज घुमत राहतो.

2 / 6

अशाच एका दिग्दर्शकाची ही कहाणी. भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक अवतार कृष्ण कौल यांचा 1974 साली प्रदर्शित झालेला चित्रपट 27 डाउन हा आजही ‘टाइमलेस क्लासिक’ म्हणून ओळखला जातो.

3 / 6

त्यांना तरुण वयात वैयक्तिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. घरातील वादानंतर वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. अत्यंत मर्यादित आधार असताना त्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवरील चहाच्या स्टॉलवर काम केले. पुढे अंबाला येथील एका हॉटेलमध्ये नोकरी केली.

4 / 6

नंतर त्यांना परराष्ट्र मंत्रालयात क्लास IV पदावर नोकरी मिळाली. ही साधी सरकारी नोकरी त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. याच माध्यमातून त्यांना अमेरिकेत पोस्टिंग मिळाली. न्यूयॉर्कमध्ये त्यांनी City University of New York येथे प्रवेश घेतला आणि फिल्ममेकिंगमध्ये बॅचलर पदवी संपादन केली.

5 / 6

अमेरिकेत राहून त्यांनी उपजीविकेसाठी विविध कामे केली. 1970 साली ते भारतात परतले. परतल्यावर त्यांना Merchant Ivory Productions च्या Bombay Talkie या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या अनुभवाने त्यांना स्वतःचा चित्रपट बनवण्याची प्रेरणा दिली.

6 / 6

1974 साली त्यांनी ‘27 डाउन’ हा चित्रपट लिहिला, दिग्दर्शित केला आणि निर्मितीही केली. या चित्रपटाने दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले, ज्यामध्ये हिंदीतील सर्वोत्तम फीचर फिल्मचाही समावेश होता. पण ‘27 डाउन’ प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांतच अवतार कौल यांचा मृत्यू झाला. योगायोग असा की, त्याच दिवशी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us