
बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा नेहमीच तिच्या स्टाईल आणि फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते.

स्टाईलच्या बाबतीत अभिनेत्री स्वत:ला अद्ययावत ठेवते. ती अनेकदा फिटनेस व्हिडीओ आणि नवनवीन फोटोशूटचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करते.

सध्या तिच्या लेटस्ट लुकचं सर्वत्र कौतुक होतंय. सोबतच काही जण तिच्या ड्रेसिंग स्टाईलची खिल्ली उडवत आहेत. तिनं आंतरराष्ट्रीय सुप्रसिद्ध डिझायनर गॅबी चार्बाची यांनी डिझाईन केलेला ओव्हर साईज पॅंटसूट घातला होता.

मलायकाने बॉडी फिट सूटसह ओव्हरसाईज पँट कॅरी केला होता. हे पाहिल्यानंतर लोक चकित झाले.

तिनं सूटसोबत सिंपल मेकअप करुन हिरा पन्नाचा नेकपीस घातला होता. या ओव्हरसाईज पेंट सूटची किंमत 2,98,760 रुपये आहे.