
'तारक मेहता का उल्टा' या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून अभिनेत्री दिशा वकानी लोकप्रिय झाली. तिने 1997 मध्ये 'कमसिन: द अनटच्ड' या बी-ग्रेड चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती.

'उतरन' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रश्मी देसाई ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रश्मीनेही तिच्या करिअरच्या सुरुवातीला काही हिंदी बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलंय.

'बिग बॉस' फेम सना खानने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधी 'क्लायमॅक्स'सारख्या बोल्ड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. काही वर्षांपूर्वी तिने इस्लामचं कारण देत अभिनयक्षेत्र पूर्णपणे सोडलं आहे.

'ये मेरी लाइफ है' फेम अभिनेत्री शमा सिकंदरने संघर्षाच्या दिवसांत 'बस्ती' नावाच्या बी-ग्रेड चित्रपटात काम केलं होतं. परंतु आज इंडस्ट्रीत तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

'कसौटी जिंदगी की' या मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारून अभिनेत्री उर्वशी ढोलकियाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. वयाच्या 17 व्या वर्षी तिने काही बोल्ड आणि बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

अभिनेत्री अर्चना पूरण सिंह आज कोट्यवधींची मालकीण असली तरी करिअरच्या सुरुवातीला तिने नाईलाजाने काही बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. सध्या अर्चना 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये झळकतेय.

श्वेता तिवारी ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री आहे. तिने करिअरच्या सुरुवातीला 'हमारे सैयां हिंदुस्तानी'सारख्या काही बी-ग्रेड चित्रपटांमध्ये काम केलं होतं.