अप्पर कोपर स्थानकात प्रवाशांची जीवघेणी कसरत, ट्रेन पकडण्यासाठी रुळांवर उड्या मारण्याची वेळ
उपनगरी रेल्वेच्या अप्पर कोपर स्थानकावर प्रवाशांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. पनवेल-वसई मार्गावर मर्यादित गाड्या असल्याने सकाळी प्रचंड गर्दी होते. बराच काळ गाडी नसल्याने प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करतात. यामुळे रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी आहे.
1 / 6

डोंबिवली-दिवा दरम्यानच्या पनवेल-वसई मार्गावरील अप्पर कोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना दररोज जीवघेणी कसरत करावी लागते.
2 / 6

पश्चिम उपनगरांशी कमी वेळेत जोडणाऱ्या या मार्गावर १५ वर्षांनंतरही मर्यादित गाड्या धावत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
3 / 6

विशेषतः सकाळी गर्दीच्या वेळी, पावणे सहा वाजल्यानंतर थेट सव्वा दहा वाजता दुसरी गाडी येत असल्याने, मधल्या काळात गाडीच नसते.
4 / 6

त्यामुळे सव्वा दहा वाजता येणाऱ्या गाडीला प्रचंड गर्दी उसळते.
5 / 6

त्यामुळे ती गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना चक्क रुळांवरून जीव धोक्यात घालून धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करावा लागतो.
6 / 6

या गंभीर परिस्थितीमुळे दिवा-वसई मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
Follow Us