AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: ‘विराट-रोहित सारखंच आहे’, संजू सॅमसनचा प्रश्न विचारताच रियान पराग असं का म्हणाला?

आयपीएल 2026 स्पर्धेत संजू सॅमसन हा पिवळ्या जर्सीत अर्थात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. ट्रेड विंडोच्या माध्यमातून संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात रूजू झाला आहे. असं असताना राजस्थान रॉयल्सच्या गोटात बरीच उलथापालथ झालेली दिसत आहे.

IPL 2026: 'विराट-रोहित सारखंच आहे', संजू सॅमसनचा प्रश्न विचारताच रियान पराग असं का म्हणाला?
IPL 2026: 'विराट-रोहित सारखंच आहे', संजू सॅमसनचा प्रश्न विचारताच रियान पराग असं का म्हणाला?Image Credit source: Getty Images and PTI
| Updated on: Mar 19, 2026 | 5:53 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी सर्वच फ्रेंचायझींनी आपल्या संघांची बांधणी केली आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या मिनी लिलावापूर्वी ट्रेड विंडोतून देवाणघेवाण झाली होती. राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला सोडत रवींद्र जडेजाला आपल्या संघात घेतलं आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने एकाच वेळी कर्णधार, विकेटकीपर आणि ओपनर फलंदाज गमावला आहे. असं असताना आयपीएल 2026 स्पर्धेत कर्णधारपदाची धुरा रियान परागच्या खांद्यावर असणार आहे. या पर्वापासून त्याच्या कर्णधारपदाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. मागच्या पर्वात काही सामन्यात त्याने कर्णधारपद भूषवलं होतं. पण यावेळी त्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. असं असलं तरी संजू सॅमसनची जागा भरून काढण्याचं आव्हान आहे. कारण तो संघाचा यशस्वी फलंदाज होता. त्यामुळे राजस्थान रॉयल्सपुढे मोठा पेच आहे. असं असताना रियान परागने त्याच्याबाबत आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाला रियान पराग?

राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनच्या जागी रियान परागला कर्णधार म्हणून रिप्लेस केलं आहे. पण एक फलंदाज म्हणून त्याची रिप्लेसमेंट मिळाली आहे का? संघ असं करू शकतो का? असे एक ना अनेक प्रश्न क्रीडाप्रेमींना पडले आहेत. त्यामुळेच रियान परागला या प्रश्नांचा सामना करावा लागला. नवं पर्व सुरू होण्यापूर्वी रियान पराग पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी संजू सॅमसनच्या रिप्लेसमेंटबाबत स्पष्ट मत मांडलं. ‘संजू सॅमसन बाबत बोलायचं तर आम्ही असा काही विचार करत नाही की त्या खेळाडूला रिप्लेस करायचं आहे. आम्ही फार फार तर त्या स्किलचा खेळाडू शोधू किंवा त्या नंबरवर फलंदाजी करू. पण विराट कोहली आणि रोहित शर्माची रिप्लेसमेंट नाही, तसंच संजू सॅमसनबाबत आहे. त्याची रिप्लेसमेंट नाही. तो चांगला खेळाडू आहे.’

संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्ससाठी 11 पर्वात खेळला आहे. त्याने या दरम्यानं 150 सामने खेळले असून 4 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने 14 वर्षानंतर म्हणजेच 2008 नंतर 2022 साली अंतिम फेरी गाठली होती. पण चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. आता रियान परागच्या नेतृत्वात राजस्थानचा संघ मैदानात उतरणार आहे. यंदा तरी जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होणार का? हा प्रश्न आहे. राजस्थानचा संघ इतर संघाच्या तुलनेत कमकुवत वाटतो.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात