
दिवाळी पहाट साजरी करताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी करतात. ही दिवाळी पहाट साजरी होत असताना, दिवाळी साजरी होत असताना तिथल्या संस्कृतीचं दर्शन होतं.

सज्जनगडावर सुद्धा अशाच पद्धतीनं दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. किल्ले सज्जनगडावर दिवाळीची पहिली पहाट साजरी करताना इथल्या संस्कृतीचं दर्शन घडलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने किल्ले सज्जनगड दुमदुमून निघाला होता.

छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या किल्ले सज्जनगडावर हजारो मशाली प्रज्वलित करून दिवाळीची पहिली पहाट साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने किल्ले सज्जनगड दुमदुमून निघाला. पहाटेच्या प्रहरीच हजारो मशाली प्रज्वलित झाल्याने सज्जनगड अक्षरशः प्रकाशमय झाला होता.

सज्जनगड दुर्गसंवर्धन समूहाच्यावतीने मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तुम्ही दृश्य बघू शकता, इथे असणाऱ्या प्रत्येकाच्या हातात मशाली आहेत. हातात मशाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष!