
दिवाळी म्हटलं की मोठा उत्साह पाहायला मिळतो. या निमित्ताने प्रत्येक घरात गोड पदार्थ, मिठाई पाहायला मिळतात. पण, तुम्हाला माहित आहे का बाजारात मिळणाऱ्या अनेक मिठाईंमध्ये हल्ली भेसळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो. या लेखात आपण कोणत्या मिठाईत कशाप्रकारे भेसळ केली जाते, याबद्दल जाणून घेणार आहोत.

दिवाळीनिमित्त अनेक गोड पदार्थ खाल्ले जातात. यात गुलाबजामला सर्वाधिक पसंती असते. बाजारात मिळणाऱ्या गुलाबजाममध्ये भेसळयुक्त खवा असतो. हा खवा दुधापासून नाही तर स्टार्चपासून बनवला जातो. जो आरोग्यासाठी हानिकारक असतो.

काजू कतली ही तिच्या उत्तम चवीसाठी लोकप्रिय आहे. ती काजूपासून बनवतात आणि चांदीच्या वर्खने सजवतात. मात्र, बाजारात मिळणाऱ्या बहुतांश काजू कतलीवर चांदीऐवजी अॅल्युमिनियमचा वर्ख वापरलेला असतो.

मिल्क केक हे दुधापासून बनवला जाणारा चविष्ट गोड पदार्थ आहे. हा पदार्थ पूर्णपणे दुधापासून बनवतात. मात्र हल्ली या मिल्क केकमध्येही कृत्रिम दुधाचा वापर करून भेसळ केली जाते.

खव्याचा उपयोग अनेक प्रकारच्या मिठाई बनवण्यासाठी होतो. पण हल्ली बाजारात स्टार्च मिसळून बनवलेला बनावट खवा पाहायला मिळत आहे. हे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

दिवाळीत सोन पापडी मोठ्या प्रमाणात विकली जाते. कारण ती लवकर खराब होत नाही. पण आजकाल या मिठाईतही भेसळ केली जात आहे. यात शुद्ध तुपाऐवजी डालडा वनस्पति तूप वापरले जाते.