
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री नुपूर अलंकार आज लाईमटाईटपासून दूर हलाखीचे जीवन जगत आहे.कधीकाळी 'शक्तीमान' आणि 'दिया और बाती हम' सारख्या सिरियलने घराघरात पोहचलेल्या नुपूर अलंकार यांनी मोहमाया सोडून संन्यासी जीवन सुरु केले आहे. आता त्या पाच जोडी कपड्यांसह गुहेत रहात असून भिक्षा मागून आयुष्य जगत आहे.

नुपूर अलंकार हीने अलिकडेच 'टेली टॉक इंडिया' ला मुलाखत दिली. त्यात त्यांनी आपली दु:खद कहाणी सांगितली. आता त्या 'पितांबर माँ' बनून हिमालयाच्या गुहेत रहातात, भिक्षा मागतात. उंदराने चावल्याने वा थंडीच्या जखमा त्यांना सहन कराव्या लागत आहेत. त्या म्हणतात येथे शांती आहे,बिल आणि लाईफस्टाईलचे ओझे नाही.

नुपूर यांनी सांगितले की,'माझ्या जीवनात जे काही झाले ते गुगलवर वाचायला मिळेल.त्यांनी सांगितले की पीएमसी बँक घोटाळ्याने मला जीवनातील कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले.या घोटाळ्यानंतर माझी आई आजारी पडली.तिच्या उपचाराला पैसे नव्हते. माझ्या आई आणि बहिणीचा मृत्यू माझ्यासाठी अखेरचा झटका होता.'

संन्यास घेतल्यानंतरच्या जीवनाबद्दल नुपूर सांगतात की भौतिक जीवनापासून दूर गेल्यानंतर जीवन सोपे झाले. आधी लाईट बिल, लाईफ स्टाईलचा खर्च, डायएची काळजी घ्यावी लागायची. आता वर्षातून काही वेळ मी भिक्षा मागते आणि आपल्या गुरुसोबत ती वाटून घेते.याने अहंकार संपतो असे त्या सांगतात.

आपण चार - पाच जोडी कपड्यात रहातो.लोक आश्रमात येतात आणि काही कपडे भेट देतात. ते आता पुरेसे आहेत. आपण गुहेतही राहिलो त्यामुले उंदराने चावण्याच्या जखमा आणि थंडीने होणाऱ्या जखमा आपण सहन केलेल्या आहे.

नुपुर अंलकार यांनी २०१९ मध्ये टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केला होता. घरात पैसे नव्हते सर्व अकाऊंट फ्रिज झाले होते. माझ्याकडे माझे दागिने विकण्याशिवाय पर्याय नव्हता. एका सहकाऱ्याकडून तीन हजार रुपये उधार घेतले.मी मित्रांकडून एकूण ५० हजार उधार घेतले. आम्हाला माहिती नव्हते ही समस्या कधी संपणार आमचे पैसे आम्हाला मिळतील की नाही हे माहिती नव्हते.

त्यांनी सांगितले की घरात काही पैसे नव्हते, अकाऊंट फ्रिज झाले होते. दागिने विकावे लागले. लोन घेऊ शकत नव्हतो, कारण पीएमसीचे नाव सांगताच लोक फोन कट करायचे. मी टॅक्स भरत होते. तरीही ही शिक्षा ?इतर बँकेत पैसे होते तेही पीएमसीत ट्रान्सफर केले होते.

या संकटाने आपल्याला जगापासून दूर नेले. आधीच मी डिसिप्लिंड आणि स्पिरिच्युअल लाईफ जगत होते. परंतू २०२२ नंतर मी संपूर्ण संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याचे नुपूर यांनी सांगितले. पतीने आणि कुटुंबाने परवानगी दिली. ईश्वरासोबत नाते गहीरे झाले. आता मी निवडलेल्या मार्गावर संतुष्ठ आहे. इतरांनाही साधे जीवन जगण्याचा आणि ईश्वराशी जुळण्याचा संदेश आपण देत आहोत असे त्यांनी सांगितले आहे.