
डीमार्ट सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या ठिकाणी रोजच्या वापरातील वस्तू, कपडे आणि घरगुती सामान MRP पेक्षा कमी दरात मिळतात. पण जर तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर कधी खरेदी करावी हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

डीमार्टमध्ये दररोज काही ना काही वस्तूंवर सूट मिळत असते. मात्र कोणत्या दिवशी कोणती वस्तू स्वस्त होईल, हे निश्चित ठरलेले नसते. तुम्ही डीमार्टमध्ये कोणत्याही दिवशी गेलात तरी तुम्हाला बहुतेक वस्तूंची किंमत ही बाजारातील किंमतीपेक्षा कमीच पाहायला मिळेल.

त्यामुळे डीमार्टमध्ये कोणताही एक दिवस सर्वात स्वस्त असतो असे म्हणता येणार नाही. पण डीमार्टमध्ये खूप मोठी सूट किंवा एकावर एक फ्री (Buy One Get One) सारख्या आकर्षक ऑफर्स काही विशेष दिवसांमध्ये पाहायला मिळतात.

शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांत डीमार्टमध्ये मोठी गर्दी होते. यादरम्यान अनेक ऑफर्सही दिल्या जातात. या तीन दिवशी किराणा, कपडे, सौंदर्य प्रसाधने (स्किन केअर) यांसारख्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाते.

Buy One Get One (एकावर एक मोफत) सारख्या स्कीम्स या साधारणपणे दिवाळी, दसरा, होळी, ख्रिसमस, नवीन वर्ष यांसारख्या मोठ्या सणांच्या काळात जास्त दिसतात.

सण-उत्सवाच्या वेळी डीमार्टमध्ये खरेदीसाठी उत्तम ऑफर्स आणि सवलती असतात. त्यामुळे सणासुदीचा काळ हा मोठी खरेदी करण्यासाठी सर्वात सर्वोत्तम दिवस मानला जातो.

काही डीमार्टमध्ये रविवारनंतर शिल्लक राहिलेल्या वस्तू लवकर विकण्यासाठी क्लिअरन्स सेल लावला जातो. या सेलमध्ये काही निवडक वस्तूंवर अतिरिक्त सूट दिली जाते.

जर तुम्ही डीमार्ट रेडी ॲप वापरून ऑनलाईन ऑर्डर करत असाल, तर तुम्हाला काही विशिष्ट दिवशी म्हणजेच सोमवार किंवा बुधवार या दिवशी ऑनलाईन डील आणि कूपन मिळू शकतात.पण या ऑफर्स फक्त ऑनलाइन ऑर्डर करतानाच उपलब्ध असतात. त्यामुळे, ॲप वेळोवेळी तपासा.