रात्री कुत्री-मांजरांना खरंच दिसतात भूत? यामागचं सत्य ऐकून थक्क व्हाल!

रात्री अचानक कुत्रे भुंकू लागले किंवा मांजरी रिकाम्या जागेकडे टक लावून पाहू लागल्या की अनेकांच्या मनात भुताचा विचार येतो.पण यामागचं नेमकं सत्य तुम्हाला माहित आहे का? वाचा

| Updated on: Oct 26, 2026 | 10:09 PM
1 / 7
रात्रीचे बारा वाजलेले असतात, सगळीकडे शांतता असते आणि अचानक कुत्रा बाहेर जोरात भुंकू लागतो किंवा रडू लागतो. कधी कधी तर रिकाम्या जागेकडे टक लावून पाहत राहतो. आपल्याला या गोष्टी कधीकधी विचित्र वाटतात आणि याचा संबंध आपण भुताशी लावतो.

रात्रीचे बारा वाजलेले असतात, सगळीकडे शांतता असते आणि अचानक कुत्रा बाहेर जोरात भुंकू लागतो किंवा रडू लागतो. कधी कधी तर रिकाम्या जागेकडे टक लावून पाहत राहतो. आपल्याला या गोष्टी कधीकधी विचित्र वाटतात आणि याचा संबंध आपण भुताशी लावतो.

2 / 7

तर कधी मांजर अंधारात काहीतरी दिसल्यासारखं करतं आणि इकडेतिकडे पाहू लागतं किंवा पळायला सुरूवात करतं.अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न येतो या प्राण्यांना खरंच भूत दिसतं का? माणसांना जे दिसत नाही ते कुत्रे आणि मांजर पाहू शकतात का? तर जाणून घ्या

3 / 7

कुत्रा अचानक रात्री भूंकू लागला की अनेकांना वाटतं,त्याला काहातरी अदृश्य दिसलं असावं. मात्र कुत्र्‍यांची ऐकण्याची क्षमता माणसांपेक्षा जास्त असते. दूरवरून येणारे आवाज, एखाद्या प्राण्याची हालचाल किंवा अगदी बारीक आवाजही त्यांच्या कानावर सहज पडतात. त्यामुळे आपल्याला काही जाणावत नसताना कुत्रा एखाद्या दिशेला पाहून भुंकत असू शकतो. तर त्यामागे भूतच आहे असे नाही.

4 / 7

मांजरे अंधारात काय पाहतात ?: मांजरांच वागणंही अनेकदा गूढ वाटतं. कधी ती अचानक एका जागेवरून दुसरीकडे उडी मारतात. तर कधी भिंतीकडे किंवा छताकडे टक लावून पाहतात. पण मांजराची दृष्टी कमी प्रकाशात पाहण्यासाठी अनुकूल असते. त्यामुळे अंधारात फिरणारा छोटासा कीटक, हलणारी सावली किंवा बारीक हालचालही त्यांच्या लक्षात येतं

5 / 7

मग भूतांच्या गोष्टी खऱ्या आहेत का ? : कुत्रे आणि मांजरे भूत पाहू शकतात, याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. त्यामुळे रात्री प्राणी विचित्र वागत असतील, तर त्याचा अर्थ भूत दिसली असा होत नाही.

6 / 7

काही वेळा कुत्रा किंवा मांजर वेदना, आजार किंवा तणावामुळेही विचित्र आवाज काढतात. असं वारंवार होत असेल किंवा त्यांच्या वागण्यात अचानक बदल दिसत असेल तर पशुवैद्यांचा सल्ला घ्यावा.

7 / 7

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us