
भारतीय लोक दही या खाद्यपदार्थाला आवडीने खातात. अनेकांच्या जेवणात दही तर असते. मात्र काही पदार्थांसोबत दही खाऊ नये. तसे केल्यास शरीरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

दही खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते तसचे अनेक जीवनसत्त्वेदेखील मिळतात. मात्र काही पदार्थांसोबत दह्याचे सेवन केल्यास तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. कधीकधी त्त्वचासंबंधी एखादा आजार उद्भवू शकतो.

दही आणि कांदा एकत्र खाऊ नये असे म्हटले जाते. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्यास जळजळ, उलटी असा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच कांदा आणि दही एकत्र खाऊ नये असा सल्ला दिला जातो.

दही थंड असते. तर आंबा गरम असतो. त्यामुळे ते एकत्र खाऊ नयेत असं म्हटलं जातं. दही आणि आंबा सोबत खाल्ल्यास शरीरातील गरमी वाढते असे म्हटले जाते. यामुले पोटाची समस्या निर्माण होऊ शकते.

आयुर्वेदानुसार दही आणि मासे सोबत खाऊ नयेत. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले तर त्यांचे पचन होणे कठीण होऊन जाते. त्यामुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)