
हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अनेक नियम आहेत. यातील काही नियम विशेषतः महिलांसाठी आहेत. असे मानले जाते की हे नियम पाळले नाहीत तर त्यांचे अशुभ परिणाम होतात. हिंदू शास्त्रात सूर्यास्तानंतर काही मुख्य नियम असे आहेत, उदाहरणार्थ - सूर्यास्तानंतर घर झाडू नये, झोपू नये, दान किंवा कर्ज देऊ नये.

तसेच, सूर्यास्ताच्या वेळी महिलांसाठी एक विशेष नियम आहे की संध्याकाळनंतर महिलांनी केस उघडे ठेवू नयेत आणि केस उघडे ठेवून बाहेर जाऊ नये. याच कारणामुळे घरातील वृद्ध महिला, म्हणजे आपल्या आजी किंवा पणजी, रात्री केस उघडे दिसलयास आपल्याला फटकारतात.

आजच्या आधुनिक जीवनशैलीत हे निर्बंध मिथकांसारखे वाटतात, आपण मोठ्यांच म्हणणं, त्यांचा सल्ला गांभीर्याने घेत नसलो, तरी नियम शास्त्र आणि विज्ञान या दोन्हीशी संबंधित आहेत. अशा परिस्थितीत, असे नियम पाळल्यास भविष्यात समस्या टाळता येतात. संध्याकाळनंतर केस उघडे ठेवले नाहीत तर काय होतं ते जाणून घेऊया.

सूर्यास्तानंतर केस उघडे ठेवल्यास काय होते?: आजकाल केस उघडे ठेवणे फॅशनेबल मानले जाते. अशा परिस्थितीत, महिलांना संध्याकाळी केस उघडे ठेवणेच आवडते असे नाही तर त्यांना तसंच बाहेर जायलाही आवडते. मात्र, शास्त्रानुसार, असं करणे निषिद्ध मानले जाते. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांच्या मते, शास्त्रांमध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन न केल्याने जीवनावर नकारात्मक परिणाम होतो आणि व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

सूर्यास्तानंतर केस उघडे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा लवकर आकर्षित होते, असे मानले जाते. जर महिला केस उघडे ठेवून बाहेर पडल्या तर तंत्रक्रिया किंवा नकारात्मक शक्तींच्या जाळ्यात अडकण्याचा धोका वाढतो.

हे वाईटाचे कारण मानले जाते. हिंदू धर्मातील शास्त्रांनुसार तसेच पौराणिक मान्यतेनुसार, संध्याकाळनंतर केस उघडे न ठेवण्याची अनेक उदाहरणे आहेत. सीतेच्या आईनेही त्याना लग्नाच्या वेळी केस बांधण्यास सांगितले. त्यांनी सीताजींना सांगितले की केस बांधल्याने नातेसंबंधही मजबूत होतात. शास्त्रांमध्ये, सोडलेले, अस्ताव्यस्त केस हे अशुभ मानले जातात.

पौराणिक कथेनुसार, रामाला वनात पाठवण्यापूर्वी कैकेयी कोपभवनात गेली तेव्हा तिचे केस उघडे होते. असेही मानले जाते की महिलांनी केस उघडे ठेवून एकटे झोपू नये. तथापि, त्या त्यांच्या पतींसोबत झोपताना त्यांचे केस उघडे ठेवू शकतात.

याबद्दल विज्ञान काय म्हणतं ? विज्ञानानुसार, रात्री केस उघडे ठेवणे चांगले मानले जात नाही. केस पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर, ते गुंतू नयेत म्हणून ते बांधणंच चांगलं असतं.रात्री केस उघडे ठेवल्याने गुंता होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात आणि तुटू शकतात. जर झोपताना चेहऱ्यावर केस आले तर त्यामुळे झोपेत त्रास होऊ शकतो आणि त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका देखील असतो. अशा परिस्थितीत जर घरातील वडीलधाऱ्यांनी तुम्हाला केस बांधण्याचा सल्ला दिला तर त्यांच्या सल्ल्याकडे नक्कीच लक्ष द्या. हे तुमच्यासाठी चांगले राहील . ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)