
बागेत आपण अनेक प्रकारची झाडे लावतो. यात काही फुलझाडं तर काही फळांचीही झाडे असतात. आयुर्वेदिक महत्त्व असलेल्याही काही वनस्पती अनेकजण बागेत लावतात. आपली बाग सुंदर कशी दिसेल, यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात.

परंतु काही लोक बाग सुंदर दिवासी या एका कारणामुळे नको ते प्रयोग करतात. कधीकधी तर विषारी गुणधर्ण असणारी झाडेदेखील काही लोक लावतात. या झाडांना स्पर्श केला किंवा त्या झाडांच्या संपर्कात आल्यास शरीरावर वाईट परिणाम होतो.

त्यामुळेच अशा प्रकारची झाडे बागेत लावणे टाळावे. काही झाडांची फुलंदेखील शरीरासाठी खूप खोदादायक असतात. त्या फुलांचे परागकण श्वसनावाटे शरीरात गेले तर अॅलर्जी, शिंका येणे असा त्रास व्हायला लागतो. यासह काही लोकांच्या अंगाला खाजही येते.

दरम्यान, असे एक फुलझाड आहे, जे दिसायला तर खूपच सुंदर दिसते. परंतु हे फुल आणि फुलाचे झाडे तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. या फुलाचे नाव कण्हेरी असे आहे. कण्हेरीचे फुल लाल-गुलाबी रंगाचे असते. या फुलझाडाची पाने खाल्ल्यास ते शरीरासाठी धोकादायक असल्याचे मानले जाते. काही लोकांनी या पानांना हात लावला तरीही त्यांना अॅलर्जीचा त्रास होतो.

(टीप- वरील लेख प्राथमिक माहितीवर आधारलेला आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)