शूटिंग पाहायला गेलेल्या अभिनेत्रीला ‘महाभारत’मध्ये मिळाला मोठा रोल, सेटवरच फुललं प्रेम, पण साखरपुडा तुटला
बॉलिवूडमधील एकमेव अभिनेत्री जी शूटिंग बघण्यासाठी गेली अन् झाली अभिनेत्री. मालिकेच्या सेटवरच झालं अभिनेत्यासोबत प्रेम. पण तुटलं लग्न. अनेक अभिनेत्यासोबत केलं काम.

Bollywood Actress : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकरच्या करिअरची सुरुवात आणि ‘महाभारत’मधील तिची एन्ट्री ही एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच रंजक आहे. एका साध्या भेटीतून मिळालेल्या संधीने तिला एका रात्रीत स्टार बनवलं.
महाभारत या गाजलेल्या मालिकेत ‘उत्तरा’ची भूमिका वर्षा उसगांवकरने साकारली. विशेष म्हणजे, तिने या भूमिकेसाठी कोणताही ऑडिशन दिली नाही. तिचे वडील मात्र तिला या मालिकेचा भाग व्हावं अशी इच्छा व्यक्त करत होते. मात्र, वर्षा स्वतः कधीही त्या दृष्टीने प्रयत्न करत नव्हती.
मालिका सुरू झाल्यानंतर जवळपास एका वर्षाने त्या कुटुंबासोबत शूटिंग पाहण्यासाठी सेटवर गेल्या होत्या. त्या वेळी त्या फक्त प्रेक्षक म्हणून उपस्थित होत्या. याच दरम्यान, ‘उत्तरा’च्या भूमिकेसाठी नवीन चेहरा शोधला जात होता.
एका नजरेत बदललं आयुष्य
त्या वेळी सेटवर गुफी पेंटल उपस्थित होते, ज्यांनी मालिकेत ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारली होती. त्यांच्या नजरेत वर्षा उसगांवकर भरल्या आणि त्यांनी लगेचच तिला ही भूमिका करण्याची ऑफर दिली. वर्षा आणि तिच्या कुटुंबीयांनी ही संधी लगेच स्वीकारली आणि कोणत्याही स्क्रीन टेस्टशिवाय तिला हा मोठा ब्रेक मिळाला.
‘महाभारत’मधील वर्षाची एन्ट्री एका सुंदर कथक नृत्याने झाली होती. हे नृत्य प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गोपी कृष्ण यांनी कोरिओग्राफ केलं होतं. या एका सीनने वर्षा उसगांवकर रातोरात संपूर्ण देशभरात लोकप्रिय झाली आणि तिच्या समोर हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले.
मराठी रंगभूमीपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास
वर्षा उसगांवकरने आपल्या करिअरची सुरुवात मराठी रंगभूमीपासून केली होती. सचिन पिळगांवकर यांनी तिला गम्मत जम्मत या चित्रपटातून लाँच केलं. ‘महाभारत’च्या यशानंतर तिने 1990 साली जॅकी श्रॉफसोबत दूध का कर्ज या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
यानंतर तिने ‘तिरंगा’, ‘हनीमून’ आणि ‘घर आया मेरा परदेसी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिने अक्षय कुमार, ऋषी कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही स्क्रीन शेअर केली.
वैयक्तिक आयुष्यातील वळण
‘महाभारत’च्या सेटवर काम करताना वर्षा उसगांवकर आणि नीतीश भारद्वाज यांच्यात जवळीक वाढली. नीतीश यांनी मालिकेत ‘कृष्ण’ची भूमिका साकारली होती. दोघांनी साखरपुडाही केला होता, मात्र काही कौटुंबिक कारणांमुळे हे नातं पुढे जाऊ शकलं नाही. त्यानंतर वर्षा उसगांवकरने अजय शंकर यांच्याशी विवाह केला.
