AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री विनातिकीट प्रवासात TC ने पकडले तर घाबरु नका; रेल्वेचा एक नियम वाचून तुम्हाला मिळेल दिलासा

रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे हा गुन्हा असला तरी रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचे काही खास नियम आहेत. टीटीई तुम्हाला रात्री गाडीतून उतरवू शकतो का आणि पकडले गेल्यास नक्की किती दंड भरावा लागतो, याबद्दलची सविस्तर माहिती आणि तुमचे अधिकार येथे वाचा.

रात्री विनातिकीट प्रवासात TC ने पकडले तर घाबरु नका; रेल्वेचा एक नियम वाचून तुम्हाला मिळेल दिलासा
indian railway
| Updated on: Apr 19, 2026 | 2:21 PM
Share

रेल्वेने प्रवास करताना अनेकदा घाईगडबडीत आपल्याकडून तिकीट काढायचे राहून जाते. अशा वेळी मनात एकच धास्ती असते, ती म्हणजे टीटीईची (TTE). विनातिकीट प्रवास करणे हा गुन्हा असला तरी, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने काही कडक आणि काही दिलासादायक नियम बनवले आहेत. जर तुम्ही रात्रीच्या प्रवास करत असताना जर तुमच्याकडे तिकीट नसेल आणि टिटीई आला तर मग पंचाईत होते. मग तो आपल्याला ट्रेनमधून खाली उतरवेल अशी भीती अनेकांना वाटत असते. पण या अशावेळी टीटीईने पकडल्यावर नक्की काय होते आणि तुमचे अधिकार काय आहेत, हे समजून घेऊया.

रात्रीच्या वेळी ट्रेनमधून उतरवता येते का?

रेल्वेच्या नियमांनुसार, प्रवाशांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. जर एखादा प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडला गेला, तर टीटीई त्याला रात्रीच्या वेळी कोणत्याही निर्जन किंवा असुरक्षित स्टेशनवर उतरवू शकत नाही. प्रवाशाकडे पैसे नसतील तरीही त्याला सुरक्षिततेच्या कारणास्तव पुढच्या मोठ्या स्टेशनपर्यंत (जंक्शन) प्रवास करू दिला जातो. त्या मोठ्या स्टेशनवर आरपीएफ (RPF) तैनात असते, तिथे प्रवाशाला उतरवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाते.

दंड किती?

रेल्वेच्या नियमांनुसार, जर एखादा प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडला गेला, तर त्याला प्रवासाच्या अंतराचे पूर्ण भाडे आणि किमान २५० रुपये दंड भरावा लागतो. जर प्रवाशाने हेतुपुरस्सर रेल्वेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर रेल्वे कायद्याच्या कलम १३७ नुसार खालील कारवाई होऊ शकते. जर तुम्ही दंड भरण्यास नकार दिला, तर रेल्वे पोलीस (RPF) तुम्हाला अटक करू शकतात. तसेच फसवणुकीचा हेतू आढळल्यास १,००० रुपये दंड किंवा ६ महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमुळे रेल्वेचे मोठे नुकसान होते. केवळ २०२५ मध्ये रेल्वेने अशा प्रवाशांकडून १७८१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

प्रवाशांनी काय करावे?

  1. ओळखपत्र तपासा: दंड भरण्यापूर्वी संबंधित टीटीईचे अधिकृत ओळखपत्र पाहण्याचा तुम्हाला अधिकार आहे.
  2. पावतीची मागणी करा: तुम्ही भरलेल्या प्रत्येक रुपयाची अधिकृत पावती टीटीईकडून घ्या. पावती नसेल तर तो दंड अधिकृत मानला जात नाही.
  3. स्वतःहून माहिती द्या: जर तुम्ही चुकून तिकीटाशिवाय गाडीत चढलात, तर टीटीई तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी स्वतःहून त्यांना जाऊन भेटा आणि तुमची अडचण सांगून तिकीट बनवून घ्या.
  4. रेल्वे नियम कडक असले तरी ते प्रवाशांच्या हितासाठीच आहेत. त्यामुळे दंड आणि अपमान टाळण्यासाठी नेहमी वैध तिकीट काढूनच प्रवास करा.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...