
शुक्र देवाला स्वच्छता खूपच प्रिय असते. जर तुम्हाला शुक्र ग्रहाला प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही स्वच्छती राखण खूप महत्त्वाचे असते. याची सुरुवात तुमच्या शरीरापासून करा. त्यानंतर तुमचे कपडे नेहमी स्वच्छ ठेवा. त्याप्रमाणे स्वच्छ अंघोळीसाठी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये वेलचीसुद्धा वापरू शकता. यावेळी तुम्ही "ॐ द्रां द्रं द्रौं सः शुक्राय नमः" हा मंत्रसुद्धा बोलू शकता.

शुक्र देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांचा आधिपती असणाऱ्या शंकराची तुम्ही आराधना करु शकता. हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून तुम्ही महादेवाची पूजा करु शकता. ही पूजा झाल्यानंतर तुम्ही महादेवाला सफेद रंगाचे फुल आणि प्रसाद अर्पण करु शकता.

शुक्र देवाला पांढरा आणी गुलाबी रंग सर्वात प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी या रंगाचे कपडे , फुल, परिधान करणे नेहमी फायद्याचे ठरते. शुक्रवारी सफेद रंगाच्या गोष्टी म्हणजेच दुध. दही, मिठाई यांसारख्या गोष्टी तुम्ही दान करु शकता.

शुक्रवारी लहान मुलींना खाऊ घाला.या पुजेमध्ये पांढरे कपडे, खेळणी, अशा पांढर्या वस्तू दान करा. कन्यापूजनानंतर मुलींच्या पायांना स्पर्श करायला विसरू नका. या दिवशी गरजू मुलीला अन्नदान करण्याचा प्रयत्न करा.

शुक्रवारी तुम्ही उपवास करु शकता. या दिवशी फळांचा आहार घेण्याचा प्रयत्न करा. या दिवशी तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करु शकता. त्यामुळे शुक्र ग्रहाची कृपाही तुमच्यवर होईल.