
हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नव्या वर्षाची सुरुवात होते. यालाच हिंदू नववर्ष म्हटले जाते. यंदा 19 मार्च 2026 रोजीपासून नव्या हिंदू वर्षाला प्रारंभ होईल.

दरम्यान, हे नवे वर्ष चांगले, सुखात जावे यासाठी फक्त दोन गोष्टी करा. या तीन गोष्टी केल्यास तुमचे नवे वर्ष खूपच खास असेल. विशेष म्हणजे घरातील भांडणं नाहीसे होतील. घरात लक्ष्मी नांदेल. पैशांचीही चणचण भासणार नाही.

हिंदू धर्मात घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला खूप महत्त्व आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या दिवशी लवकर उठून अंघोळ करावी. त्यानंतर दरवाजावर आंबा किंवा अशोकाच्या झाडाच्या पानांचे तोरण बांधावे. त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा कायम राहील. घरातील नकारात्मक उर्जा नाहीशी होईल.

तुम्हाला नव्या वर्षात धनलाभ हवा असेल, आर्थिक दृष्टीने तुमची स्थिती बळकट व्हावी असे वाटत असेल तर नववर्षाच्या दिवशी महालक्ष्मी यंत्र किंवा श्री यंत्राची पूजा करावी. पूजेचे ठिकाण साफ करा. दिवा लावा. हा उपाय केल्यास धनसंपत्तीशी निगडीत अडचणी दूर होतात.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.