
शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात आधी मैदा – 2 कप, पिठी साखर चवीनुसार, अगदी चिमूटभर मीठ, तूप 2 टेबलस्पून, दूध गरजेनुसार, तळण्यासाठी तेल, ड्रायफ्रूट्स घ्या

एका भांड्यात दूध, साखर आणि थोडंसं मीठ एकत्र करून साखर पूर्णपणे विरघळू द्या. मैदा गरम करुन घ्या. एका भांड्याच मैदा घ्या आणि त्यावर गरम तूप सोडा.

नंतर त्यात साखर-दूध मिश्रण घालून घट्टसर पीठ मळा. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील घाला. त्यांनतर 20 - 30 मिनिटं झाकून ठेवा. पीठाचे लहान लहान गोळे करून त्याची मध्यम जाडीची पोळी लाटा.

पोळी लाटल्यावर ती सुरीने किंवा शंकरपाळी बनवण्यासाठी येणाऱ्या चमचाने चौकोनी तुकड्यांमध्ये कापा. कढईत तेल गरम करा आणि मध्यम आचेवर शंकरपाळी तळून घ्या. त्या सोनेरीसर झाल्या की काढा.

तळलेल्या शंकरपाळ्या थंड होऊ द्या व नंतर एअरटाईट डब्यात भरून ठेवा. अशा प्रकारे तुमची खुसखुशीत गोड शंकरपाळी खाण्यासाठी तयार झाली आहे.