
1. बद्धकोष्ठता - रोज दोन खजूर खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होऊन बद्धकोष्ठता दूर होते. खजूरात फायबरचे प्रमाण जास्त असते. आतड्यातील विषारी घटक ते बाहेर काढण्यात मदत करते ज्याने डिटॉक्सिफिकेशन मदत मिळते.

2. एंटीऑक्सीडेंट्सने भरपूर- खजूर अन्य फळांपेक्षा अधिक एंटीऑक्सीडेंट्स प्रदान करते. यातील फ्लेवोनोइड्स सारखे शक्तीशाली एंटीऑक्सीडेंट्स डायबिटीज, अल्झायमर आणि कॅन्सर सारख्या रोगांच्या धोक्याला कमी करतात. सूज कमी करण्यातही हे मदत करते. फेनोलिक एसिडच्या सूजविरोधी गुणाने हे हृदयाचे आरोग्य सुधारते.

3. डायबिटीजमध्येही लाभदायक - खजूर जरी गोड असले आणि त्यात कार्बोहायड्रेट जास्त असले तर डायबिटीजच्या लोकांसाठी तर सुरक्षित असते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे ते ब्लड शुगर वाढू देत नाही.

4. हाडांना मजबूत बनवते - खजूरात खनिजांचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे हाडे मजबूत बनतात.तसेच ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्येपासून वाचवतात. खजूरात तांबे, मॅगनीज आणि सेलेनियम सारखी खनिज असून ती हाडांच्या निर्मितीला मदत करतात.

5. त्वचेसाठी फायदेमंद - खजूर फायटोहार्मोनचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे त्वचेचे वय वाढवण्याची प्रक्रीया धीमी होते. नियमित रुपाने खजूर सेवन केल्याने सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा अधिक लवचिक होते.