GK : कार किंवा बाईकच्या चावीला का असतो मेटल टॅग ? फेकून देण्याआधी हे नक्की वाचा, नंतर पस्तावाल

नवीन कार किंवा बाईक घेतली, की त्याच्या किल्लीसोबत जो मेटल टॅग मिळतो, तो अनेकदा निरुपयोगी समजून फेकून दिला जातो. मात्र, त्यावर लिहिलेला की कोड तुमच्या वाहनासाठी खूप उपयुक्त असतो. हा टॅग महत्त्वाचा का आहे आणि तो सुरक्षित ठेवणे का महत्वाचे असतं, ते समजून घेऊया.

| Updated on: Mar 24, 2026 | 9:23 AM
1 / 8
नवीन कार किंवा बाईक विकत घेणं, हा प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असतो, भरभरून फोटो काढले जातात, मिठाई भरवली जाते.  मात्र नवं वाहन घेतल्यावर शोरूममधून जी किल्ली किंवा चावी मिळते, त्याचा चावीला अनेकदा एक मेटल किंवा ॲल्युमिनियमचा टॅग असतो. पण तो निरुपयोगी समजून, चावीच्या रिंगला लावल्याबरोबरच बहुतेक लोक ते फेकून देतात. काही लोक तर तो टॅग अनेक वर्षे चावीच्या रिमोटलाच लटकवून ठेवतात. मात्र, वरवर पाहता क्षुल्लक वाटणारा हा टॅग किंवा हाँ भाग वाहनाच्या सुरक्षिततेशी आणि सोयीशी खोलवर जोडलेला आहे. जर तुम्हाला त्याचं खरं काम समजलं, तर ते फेकून देण्याचू चूक फार कमी लोकं करतील.

2 / 8
चावीसोबत हा मेटल टॅग का दिला जातो? : एखाद्या कार किंवा बाईकच्या चावीसोबत येणाऱ्या या धातूच्या लहान तुकड्यावर एक अंकीय किंवा अक्षरांकीय कोड लिहिलेला असतो. याला 'की कोड'  म्हणतात. हा कोड म्हणजे तुमच्या वाहनाच्या चावीचा टेक्निकल ओळख क्रमांक असतो.

3 / 8
जर तुमच्या वाहनाची मूळ चावी किंवा दोन्ही चाव्या कधी हरवल्या, तर नवीन चावी बनवण्यासाठी हा कोड महत्त्वाचा असतो. पूर्वी, चावी हरवल्यास कुलूप तोडावं लागत असे किंवा संपूर्ण लॉक सिस्टीम बदलावी लागत असे. मात्र, आधुनिक मशीनरीमुळे कंपन्या आता या कोडच्या आधारे आधीसारखी नवीन चावी हुबेहूब बनवू शकतात.

4 / 8
नवीन चावी बनवण्यासाठी हा कोड कसा मदत करतो ?: हा कोड अधिकृत सेवा केंद्रात दाखवल्यावर  तेव्हा तो एका विशेष मशीनमध्ये टाकला जातो. मशीन या कोडच्या आधारे चावी कापण्याचा एक विशिष्ट नमुना तयार करते.

5 / 8
त्यामुळे या प्रक्रियेने बनवलेली नवीन चावी मूळ चावीप्रमाणेच काम करते आणि लॉकमध्ये सहज बसते. मात्र, जर हा कोड उपलब्ध नसेल, तर मेकॅनिकला बराच वेळ लागू शकतो किंवा कधीकधी संपूर्ण लॉक किट बदलावे लागू शकते, जे महागत पडू शकतं.  स्मार्ट की आणि की फॉबच्या युगातही हा टॅग महत्त्वाचा का आहे?: आजकाल अनेक आधुनिक गाड्या स्मार्ट की किंवा की फॉब सिस्टीमसह येतात. या सिस्टीममध्ये इलेक्ट्रॉनिक लॉकिंगसोबत एक छोटी आपत्कालीन चावी देखील समाविष्ट असते.

6 / 8
ही चावी कधी हरवली किंवा खराब झाली तर इमर्जन्सीमध्ये नवी चावी तयार करण्यासाठी यावरचा की कोड आवश्यक असतो. एवढंच नव्हे, जर कधी तुमची चावी चोरीला गेली किंवा हरवली, तर हा कोड वापरून सर्व्हिस सेंटर सिस्टीममधून जुन्या चावीचे सिग्नल काढून टाकू शकते आणि नवीन चावीची नोंदणी केली जाऊ शकते.

7 / 8
या टॅगचे संरक्षण कसं करावं ? : हा छोटा धातूचा टॅग तुमच्या गाडीच्या चावीचा डिजिटल ओळख क्रमांक मानला जातो. त्यामुळे, त्याचे संरक्षण करणं, तो जपून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

8 / 8
त्यामुळे हा टॅग चावीसोबत लटकवू नका असा सल्ला तज्ञ देतात. हा टॅग आपल्या गाडीच्या कागदपत्रांसोबत सुरक्षित ठिकाणी ठेवणं हाच उत्तम पर्याय आहे.  जर तुम्हाला ते सोबत बाळगायचे नसेल, तर या कोडचा फोटो काढून तुमच्या मोबाईल किंवा ईमेलमध्ये सेव्ह करणे देखील शहाणपणाचं ठरतं. जर हा कोड चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागला, तर ती व्यक्ती त्याचा वापर करून डुप्लिकेट चावी बनवू शकते. त्यामुळे या लहानशा टॅगकडे दुर्लक्ष करणे ही एक गंभीर चूक ठरू शकते.

Follow Us