पुरुषांच्या 5 चुकीच्या सवयी ठरताहेत आरोग्याला घातक; कॅन्सरला मिळतंय आमंत्रण
पुरुषांच्या 5 चुकीच्या सवयी आरोग्याला घातक ठरत आहेत. या सवयीमुळे कॅन्सरला आमंत्रण मिळत आहे. तुमच्या वाईट सवयी आताच सुधारा.

समाजात बहुतांश पुरुषांवर कुटुंबाची जबाबदारी असते. त्यामुळे नोकरी करताना पुरुषांकडून आरोग्याकडे लक्ष दिलं जात आहे. काही जण ताणतणावात दारू-सिगारेटचं सेवन करतात.
तुम्ही दारू-सिगारेटच्या आहारी गेला, तर तुमच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होण्याची भीती आहे. सिगारेटमळे फार काही नुकसान होणार नाही, असे तुम्हाला वाटत असेल. परंतु तुमचा गैरसमज आहे. सिगारेट आणि तंबाखूमुळे फुफ्फुसे, तोंड, घसा इत्यादी कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.
दारूच्या सवयीने लिव्हर, तोंड, अन्ननलिका आणि आतड्याचा कॅन्सर होण्याची भीती असते. तुम्ही दारूचं सेवन आणि सिगारेट ओढत असाल, तर तुम्हाला कॅन्सरचा धोका अधिक वाढू शकतो.
अनेक पुरुषांचं कमी वयात पोट सुटल्याचे दिसून येते. अनेक तास एकाच ठिकाणी बसून राहणे, व्यायाम न करणे, जेवण्याच्या चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. यामुळे मधुमेह आणि हृदयविकारासहित कॅन्सरचा धोकाही वाढतो.
अनेक पुरुष आजारपणतही डॉक्टरांकडे जाणे टाळतात. अनेक जण त्रास अंगावरच काढतात. तसेच अनेक पुरुष हे वेळेअभावी तपासण्या टाळतात. त्यामुळे आजाराचा धोका आणखी बळावतो.