
सापांबाबत अनेक गैरसमज आहेत, यामुळेच भारतातील अनेक सापांच्या दुर्मिळ प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सापांबाबत असलेले गैरसमज दूर होणं ही काळाची गरज आहे.

सापांबाबत सर्वात मोठा गैरसमज हा असतो की, प्रत्येक साप हा विषारी असतो. त्यामुळे आपण अनेकदा आपल्याला साप दिसला की त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे चुकीचं आहे, आपण आपल्या घराच्या परिसरात कुठेही साप आढळल्यास सर्पमित्राला फोन केला पाहिजे.

भारतामध्ये सापाच्या हजारो प्रजाती आढळतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती या विषारी आहेत. घोणस, फुरसे, मण्यार, आणि नाग ज्याला आपण कोबरा म्हणतो. या चार जाती सर्वाधिक विषारी असतात. त्यांना बिग फोर असं देखील म्हटलं जातं.

सापांबाबत असा देखील एक गैरसमज आहे, की साप नैसर्गिकरित्या मरत नाही, त्याला मारलं तरच तो मरतो. मात्र हा समज चुकीचा आहे. एका विशिष्ट वयानंतर सापाचा मृत्यू होतो.

जंगलात राहणार्या सापांचं सरासरी आयुष्य चौदा ते वीस वर्ष असतं. मात्र साप जर बंदिस्त असतील त्यांची योग्य काळजी घेतली गेली तर ते 25 वर्षांपर्यंत जगू शकतात.

सापांच्या प्रजातीमध्ये अजगरांचं आयुष्य सर्वात जास्त असतं, एक अजगर सरासरी 40 वर्षांपर्यंत जगू शकतं, इतर सापांचं आयुष्य कमी असतं.

जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला न मारता, त्याची माहिती सर्प मित्रांना द्यावी, साप हा जीवन साखळीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)