
व्हिस्की किंवा वाईनसोबत वोडका घेतल्याने नशा अधिक होतो का? सामान्यत: तळीरामांमध्ये असा समज आहे. वेगवेगळे ड्रिंक एकत्र घेतल्याने त्यातून अधिक नशा होते. तळीरामांच्या मते, तसं केल्याने पेग हार्ड होतो आणि त्याची अधिकची नशा होते. पण खरंच तसं होतं का? वाईन तज्ज्ञ सोनल हॉलँडने सांगितलं की, तुम्ही व्हिस्की घ्या किंवा वोडका प्या तुमच्या शरीरात अल्कोहलचे जाते. (Photo: Pexels)

अनेकांना दोन ड्रिंक्स एकत्र करून प्यायला आवडते. यामागे वेगवेगळी कारणं दिली जातात. मग बाईन, बियर किंवा व्हिस्की एकत्र प्यायल्याने नशा अधिक होते का? याबाबत वाईन तज्ज्ञाने उत्तर दिलं आहे. (Photo: Pexels)

वाईन तज्ज्ञ सोनल हॉलँड यांनी सांगितलं की, जेव्हा तुम्ही एका ड्रिंकमध्ये दुसरी ड्रिंक मिसळता तेव्हा त्याच्या चवीत बदल होतो. ही त्या व्यक्तीची वैयक्तिक पसंत असू शकते. कदाचित त्याला दोन ड्रिंक एकत्र करून पिणं आवडत असावं. पण यातून अधिकची नशा होते हे खरं नाही. (Photo: Pexels)

जेव्हा एखादी व्यक्ती वाईन पिते किंवा बियर आणि वाईन एकत्र करून पिते. तेव्हा दोन्हींच्या माध्यमातून शरीरात अल्कोहल जाते. शरीरात नशा दोन ड्रिंक एकत्र गेल्याने वाढत नाही. नशा किती होणार हे शरीरात पोहोचलेल्या अल्कोहलच्या मात्रेवर ठरतं. त्यातून एथेनॉल किती पोहोचले ते…(Photo: Pexels)

वाईन तज्ज्ञ सोनल हॉलँडच्या मते, दोन ड्रिंक एकत्र घेतल्याने नशा होते हे सांगणं चुकीचं आहे. असं काहीच होत नाही. तुम्ही कोण कोणती दारू एकत्र करून प्यायला याला काहीच अर्थ नसतो. तुमच्या शरीरात अल्कहोलची मात्रा किती गेली यावर ठरतं. अल्कोहलची मात्रा नशेचे प्रमाण ठरवते. (Photo: Pexels)