खार्ग बेटाचं नाव घेऊन ट्रम्पने इराणला पुन्हा भडकवलं, दिली मोठी हिंट

इराणचे प्रमुख तेल निर्यात केंद्र असलेल्या खर्ग बेटाचं प्रचंड सामरिक महत्त्व आहे. हे देशाच्या आर्थिक आणि लष्करी सामर्थ्याचा एक प्रमुख आधारस्तंभ मानलं जाते. जागतिक बाजारपेठांमध्ये इराणच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीसाठी हे मुख्य प्रवेशद्वार आहे.

| Updated on: Mar 30, 2026 | 12:53 PM
1 / 6
इराण-इस्रायल अमेरिका युद्धाचा आजचा 31 वा दिवस आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भलेही इराणवरील हल्ले काही दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा केली असली, तरी दोन्हा बाजूंकडून सातत्याने शाब्दित बाण सोडले जात आहेतच. तर दुसरीकडे,   अमेरिका  गुप्तपणे इराणविरुद्ध जमिनीवरील आक्रमणाची तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. अशा कारवाईच्या गंभीर परिणामांबद्दल इराणने इशारा दिला आहे. याच दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. अमेरिका इराणचे खार्ग बेट सहजपणे ताब्यात घेऊ शकते, असं मोठं विधान ट्रम्प यांनी केलं आहे. ( Photos : File Photos)

2 / 6
अमेरिकेची नजर इराणच्या तेल भांडारावर आहे. अमेरिकेकडे अनेक पर्याय आहेत आणि ते खार्ग बेट ताब्यात घेण्याचा पर्याय निवडू शकतात, असं फायनान्शिअल टाइम्सशी बोलताना, ट्रम्प यांनी  म्हटलं.  "खरं सांगायचं तर, इराणचे तेल ताब्यात घेणे ही माझी सर्वात आवडती गोष्ट आहे," असंही ते म्हणाल्याची माहिती समोर आली आहे. " कदाचित खार्ग बेट ताब्यात घेऊ  किंवा कदाचित घेणारही नाही. आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. याचा अर्थ असाही होतो की, आम्हाला तिथे काही काळ थांबावे लागेल."  असं ट्रम्प म्हणाले. या बेटावरील इराणची सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहे,आम्ही ते बेट अगदी सहजपणे ताब्यात घेऊ शकतो, असा दावाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.  ( Photos : File Photos)

3 / 6
यापूर्वीच्या वृत्तांनुसार, अमेरिकेचा संरक्षण विभाग इराणमध्ये जमिनीवरील कारवाईच्या तयारीत व्यस्त होता.  सीएनएनच्या एका वृत्तानुसार, संघर्ष गंभीर टप्प्यावर पोहोचल्याने, जर राजनैतिक प्रयत्न अयशस्वी झाले आणि इराणने दबाव आणण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर सुरूच ठेवला, तर तणाव आणखी वाढू शकतो असं अमेरिकी अधिकाऱ्यांना वाटतं.  अमेरिका अनेक पर्यायांचा विचार करत आहे. ( Photos : File Photos)

4 / 6
 यामध्ये इराणचे प्रमुख तेल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटावर हल्ला करणे, लारक बेटावर कारवाई करणे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिम टोकाजवळील अबू मुसा व इतर लहान बेटे ताब्यात घेणे यांचा समावेश आहे. जर करार झाला नाही तर अमेरिका "अधिक कठोर कारवाई" करू शकते असा इशारा  व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लिव्हिट यांनी दिला होता. ( Photos : File Photos)

5 / 6
 उत्तर पर्शियन आखातात, इराणच्या दक्षिण किनाऱ्यालगत बुशेहरजवळ वसलेल्या खार्ग बेटाचं, इराणचे प्रमुख तेल निर्यात केंद्र म्हणून प्रचंड सामरिक महत्त्व आहे. हे बेट देशाच्या आर्थिक आणि लष्करी सामर्थ्याचा एक प्रमुख आधारस्तंभ मानलं जातं. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, हे बेट इराणच्या कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारपेठेतील निर्यातीसाठी एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. विविध किनारी आणि सागरी तेलक्षेत्रांमधून पाईपलाईनद्वारे कच्चे तेल येथील साठवणूक केंद्रांवर आणले जाते आणि नंतर मोठ्या टँकरद्वारे त्याची निर्यात केली जाते. ( Photos : File Photos)

6 / 6
अबुझार, फारुझान आणि दुरुद यांसारख्या प्रमुख सागरी तेलक्षेत्रांमधून कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. या बेटावरील खोल पाण्यातील सुविधा मोठ्या तेलवाहू जहाजांना हाताळण्यास सक्षम आहेत, त्यामुळे जिथे मोठ्या प्रमाणावर तेल निर्यात शक्य आहे, इराणच्या किनारपट्टीवरील अशा काही मोजक्या ठिकाणांपैकी हे बेट एक आहे.  ( Photos : File Photos)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us