
डोनाल्ड ट्रम्प दुसर्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी आले. त्याची धास्ती भारतीय शेअर बाजाराने घेतली. एकाच सत्रात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 8.30 लाख कोटींचा फटका बसला.

सेन्सेक्स 75 हजार अंकांच्या स्तरावर तर निफ्टी 23 हजार अंकांपेक्षा खाली घसरला. डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापारी धोरण हे अमेरिकन केंद्रीत असल्याने त्याचा थेट मॅसेज जगभरातील बाजारातून समोर आला.

परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून निधी काढून घेण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. कंझ्युमर ड्युरेबल्स आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित स्टॉकमध्ये घसरण दिसून आली.

जानेवारी महिन्यात शेअर बाजारात 3 टक्क्यांची घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये 3 टक्क्यांहून अधिक तर निफ्टीत 2.80 टक्क्यांची घसरण दिसून आली.

डोनाल्ड ट्रम्प यांची धोरण अजून एकदम उघड झालेली नाही. पण येत्या काळात बाजारात अजून घसरण येण्याची शक्यता दिसून येत आहे.

टाटा समूहाचा ट्रेंट कंपनीचा शेअर 6 टक्के घसरला. तर एनटीपीसी, अदानी पोर्टच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली. तर आयसीआयसीआय बँक आणि अदानी या शेअरमध्ये पण घसरण दिसली.