Donald Trump : टॅरिफचा डाव US वरच उलटला, ट्रम्प यांना धक्का, अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांच्याकडून मोठं सत्य उघड

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मागे लागले आहेत. जगातील अन्य देशांकडून व्यापारात अमेरिकेवर अन्याय होतो, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. म्हणून त्यांनी अमेरिकेत होणाऱ्या सामनावर आयात शुल्क म्हणजे टॅरिफ वाढवला. त्याने काय साध्य झालं, ते जाणून घेऊया.

| Updated on: Oct 08, 2025 | 1:02 PM
1 / 10
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मागे लागले आहेत. जगातील अन्य देशांकडून व्यापारात अमेरिकेवर अन्याय होतो, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. म्हणून त्यांनी अमेरिकेत होणाऱ्या सामनावर आयात शुल्क म्हणजे टॅरिफ वाढवला. त्याने काय साध्य झालं, ते जाणून घेऊया.

2 / 10
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांवर 25 टक्के, तर भारत, ब्राझील सारख्या देशांवर 50 टक्के टॅरिफ लावला. पण आता त्यांचं हेच पाऊल अमेरिकेसाठी अडचणीच ठरतय. जगभरातील अनेक दिग्गज अर्थशास्त्रज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर भरपूर टीका केली.

3 / 10
आता IMF च्या माजी अर्थशास्त्री गीता गोपीनाथ यात सहभागी झाल्या आहेत. अमेरिकन टॅरिफला सहा महिने झाले, पण त्याचा काही खास परिणाम दिसत नाहीय. अमेरिकेच्या महसूलात जी वाढ झालीय, ती तिथली जनता आणि कंपन्यांकडून वसूल करण्यात आली आहे.

4 / 10
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जगात ट्रेड वॉर सारखी स्थिती आहे. चीनसोबत व्यापार युद्ध, भारत-ब्राझील या देशांवर 50 टक्के टॅरिफ. ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्के टॅरिफ लावला, मग रशियन तेल खरेदीचा मुद्दा उपस्थित करुन अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ वाढवला. पण तुम्हाला हे माहितीय का? जगातल्या इतक्या सगळ्या देशांवर टॅरिफ लावून अमेरिकेला काय मिळालं?

5 / 10
या बाबत हार्वर्ड यूनिवर्सिटीच्या अर्थशास्त्री भारतीय वंशाच्या  प्रोफेसर गीता गोपीनाथ यांनी मोठा दावा केला आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन त्यांनी म्हटलय की, याचा निगेटिव परिणाम US Economy वर झालाय.

6 / 10
'डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफ लावून सहा महिन्यापेक्षा जास्त झालेत. पण याचा काही खास परिणाम झालेला नाही', असं गीता गोपीनाथ यांनी लिहिलं आहे. अमेरिकेच्या टॅरिफने काय साध्य झालं?.

7 / 10
सरकारचा महसूल वाढला का? हो, पैसा वाढला. पण हा सर्व पैसा अमेरिकन कंपन्यांकडून वसूल करण्यात आला. काही प्रमाणात अमेरिकी खरेदीदारांकडून वसुली झाली. एकूणच ट्रम्प यांचा टॅरिफ त्यांच्यासाठी टॅक्स सारखाचा ठरला असं गीता गोपीनाथ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

8 / 10
IMF च्या माजी चीफ इकोनॉमिस्ट गीता गोपीनाथ यांच्यानुसार टॅरिफ हा थेट अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी निगेटिव स्कोरकार्ड ठरला. भारत आणि ब्राझीलकडून  आयातीवर 50% टक्के,काही भारतीय औषधांवर 100 टक्के टॅरिफ हा अमेरिकेत उत्पादन वाढवणं आणि व्यापार संतुलनासाठी होता. पण या निर्णयाचा अमेरिकेला खूप कमी आर्थिक फायदा झाला.

9 / 10
टॅरिफमुळे अमेरिकेतील महागाई दराच विश्लेषण करताना गीता गोपीनाथ म्हणाल्या की, महागाईत थोडी वाढ झालीय. खासकरुन देशातंर्गत उपकरणं फर्नीचर, कॉफी सारख्या पदार्थांच्या किंमती वाढल्या.

10 / 10
फक्त गोपीनाथच नाही, जगातील वेगवेगळ्या एक्सपर्ट्सनी आपपाल्या पद्धतीने ट्रम्प यांच्या टॅरिफवर टीका केली. एकंदर असं दिसतय ट्रम्प यांनी अमेरिकेलाच खड्डयात घातलय.