

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अनेक आलिशान बंगले आहेत. त्यातील एक एकदम खास आहे. फ्लोरिडा प्रांतामधील Mar-a-Lago बंगला येथे ते पत्नीसोबत राहतात.


फायनेन्शिअल टाईम्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे रोल्स- रॉयल सिल्व्हर क्लाउड, फँटम, मर्सिडिज बेंज एसएलआर मॅकलेरन, लॅम्बोर्गिनी डियाब्लो, टेस्ला रोडस्टर आणि कॅडिलॅक एलांटे यासारख्या कार आहेत. त्यांच्याकडे एक चॉपर पण आहे.

ट्रम्प यांची संपत्ती रिअल इस्टेटमधून कमावलेली आहे. त्यात ट्रम्प टॉवर आणि 1290 एव्हेन्यू ऑफ द अमेरिकामध्ये भागीदारी आहे. ट्रम्प हे मीडिया आणि टेक्नॉलॉजी समूहाचा पण भाग आहेत.