Chanakya Niti : या गोष्टींना चुकूनही पाय लावू नका, नाहीतर..! जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

चाणक्य नीतीनुसार आयुष्यात प्रत्येकाकडून चुका होतात. पण काही चुका कटाक्षाने टाळणं गरजेचं आहे. अशाच चुकांबाबत चाणक्य नीतीत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. चला जाणून घेऊयात याबाबत

| Updated on: Apr 21, 2023 | 3:38 PM
1 / 5
आचार्य चाणक्य यांनी त्या काळात मांडलेल्या बाबी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे त्यांनी नेमकं काय म्हंटलं आहे याबाबत सखोल अभ्यास आजही केला जातो. चाणक्य नीतीत रोजच्या वागण्यात काही गोष्टी टाळणं गरजेचं असल्याचं म्हंटलं आहे.

आचार्य चाणक्य यांनी त्या काळात मांडलेल्या बाबी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे त्यांनी नेमकं काय म्हंटलं आहे याबाबत सखोल अभ्यास आजही केला जातो. चाणक्य नीतीत रोजच्या वागण्यात काही गोष्टी टाळणं गरजेचं असल्याचं म्हंटलं आहे.

2 / 5

हिंदू धर्मात अग्निला देव मानलं जातं. पूजा पाठ आणि मांगलिक कार्यात अग्निला साक्षी मानून पूजा केली जाते. त्यामुळे कधीच अग्निला पाय लावू नये. असं करणं म्हणजे अपमान करण्यासारखं आहे. चुकून असं झालंच तर मनापासून नमस्कार करून माफी मागावी.

3 / 5

चाणक्य नीतीनुसार, कुमारी मुलींना कधीही पाय लावू नये किंवा मारू नये. लहान मुली देवाचं रुप असतात. त्यांना पाय लावणं म्हणजेच अपमान करण्यासारखं आहे. चुकून पाय लागलाच तर पाय पडून माफी मागावी.

4 / 5

गुरु आपल्याला शिक्षण देते. त्यामुळे गुरु, शिक्षक यांना कधीही पाय लावू नये. या व्यतिरिक्त आई वडील आणि घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींना कधीच पाय लावू नये. असं केल्यास आपण पापाचे धनी होतो.

5 / 5

हिंदू धर्मात गाईला मातेचं रुप मानण्यात आलं आहे. तसेच गाईचं पूजनही केलं जातं. त्यामुळे गाईला पाय लावू नये. काही जण गाईला पळवून लावण्यासाठी पाय मारतात. त्यामुळे पापाचे धनी ठरतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us