
मुंबईतील शिवतीर्थावर ऐतिहासिक असा शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला दरवर्षी हजारोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित असतात. मात्र, कोरोना महामारीमुळे या वर्षीचा दसरा मेळावा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. कोरोनामुळे 50 मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते.

यावेळी "काही लोकांना सत्तेचे स्वप्न पडत आहेत. आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे नाहीत. वाटेला जाल तर काय ते दाखवून देऊ" असे म्हणत, उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फैलावर घेतलं.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय राजकीय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते.

या वर्षीच्या दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठकारे, मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मंत्री सुभाष देसाई, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदी नेते उपस्थित होते.

खासदार संजय राऊत यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. यावेळी राऊत यांनी आमचा हिंदुत्वाचा, स्वातंत्र्यवीर सावकरांचा वारसा आहे. आम्हाला कुणी हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही असे म्हणत, विरोधकांना चांगलेच ठणकावले.

अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तडाखेबंद भाषणातून विरोधकांची पिसे काढली.

उद्धव ठाकरे यांनी माय मरो, गाय जगो हे हिंदुत्व आम्हाला नको. देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा, असे परखड मत व्यक्त केले.

पाहा आणखी काही फोटो...

पाहा आणखी काही फोटो...

पाहा आणखी काही फोटो...