बंद गळ्यात गुदमरायचं, म्हणून… APJ अब्दुल कलाम यांचे 3 सुट कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत, तो किस्सा काय?

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आजही चर्चेत असतात. त्यांच्या कपड्यांशी संबंधित एक खास गोष्ट म्हणजे ‘कलाम सूट’. त्यांच्या आवडीनिवडींमधून तयार झालेल्या या सूटची कहाणी रंजक आहे.

| Updated on: Oct 15, 2026 | 4:36 PM
1 / 5
दिल्लीतील करोल बाग येथील Fairdeal दुकानाचे मालक अमन जैन जवळपास 20 वर्षे कलाम यांच्यासाठी कपडे शिवत होते. राष्ट्रपती झाल्यानंतर कलाम यांना औपचारिक बंदगळा सूट परिधान करावा लागणार होता. मात्र, गळ्याभोवती घट्टपणा नको, अशी त्यांची इच्छा होती.

2 / 5

अमन जैन यांनी बंदगळ्यासारखा दिसणारा, पण गळ्याजवळ मोकळीक असलेला सूट तयार केला. त्यामुळे बोलताना सहजता राहावी, हा उद्देश साध्य झाला. पुढे या खास डिझाइनला ‘कलाम सूट’ म्हणून ओळख मिळाली.

3 / 5

अब्दुल कलाम यांना आकाशी निळा आणि फिकट राखाडी असे रंग खूप आवडत होते. काळ्या रंगाचा सूट घालणे त्यांना पसंत नव्हते. त्यांच्या कपड्यांमधूनही साधेपणा महत्त्व दिल्याचे दिसते.

4 / 5

27 जुलै 2015 रोजी कलाम यांनी या जागाचा निरोप घेतला. त्यांच्यासाठी शिवलेले 3 सूट दुकानातच राहिले. हे सूट 31 जुलैला त्यांच्या घरी पोहोचवायचे होते, मात्र तसे होऊ शकले नाही.

5 / 5

अब्दुल कलाम यांचे सुट, पेन आणि काही पुस्तके आजही जनत करून ठेवण्यात आली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us