
ड्रॅगन फ्रुट फेस पॅक तयार करायचं असेल तर, एक ड्रॅगन फ्रुट घ्या त्याची पेस्ट तयार करा. तुम्ही तयार केलेल्या या पेस्टमध्ये गुलाबपाणी, बेसन आणि कच्चे दूध मिक्स करा. ही पेस्ट घ्या आणि चेहऱ्याला लावा. २० मिनिटे ही पेस्ट ठेवा. यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

ड्रॅगन फ्रूटचे अनेक फायदे आहेत त्यातला एक म्हणजे याने त्वचा चांगली होते. ड्रॅगन फ्रुटचा फेस पॅक लावल्याने डेड स्किन निघून जाते. हे फेस पॅक चेहऱ्यावर जमा झालेली घाण काढून टाकते.

व्हिटॅमिन सी चेहऱ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. हे व्हिटॅमिन त्वचेसाठी उत्तम आहे. ड्रगन फ्रूट कॉलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

ड्रॅगन फूट खाल्ल्याने काय फायदे होतात हे तर ऐकलंच असेल. पण ते चेहऱ्याला लावायचा सुद्धा सल्ला दिला जातो. ड्रॅगन फ्रूट चेहरा चमकदार बनवतो. याचा आहारात आणि स्किन केअर रुटीनमध्ये समावेश करा.

अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी या गोष्टी त्वचेसाठी सगळ्यात महत्त्वाच्या मानल्या जातात. ड्रॅगन फ्रुटमध्ये हे सगळं मुबलक प्रमाणात आहे. अँटीऑक्सिडेंट त्वचेला तरुण बनवते, चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या कमी करते.