भर दुपारी दारु पिणं पडेल महागात! 26 हजारांचा दंड जागेवरच मोजावा लागणार

प्रत्येक देशात दारू पिण्याविषयी अनेक सामाजिक मान्यता, परंपरा आहेत. या देशात तर खास आनंद लुटण्यासाठी अनेक जण स्वखर्चाने, कंपनीच्या खर्चाने जातात. पण तिथल्या नवीन नियमामुळे अनेक जण जरा खट्टू झाले आहेत.

| Updated on: Nov 23, 2025 | 4:19 PM
1 / 6
अनेक समाजात दारू पिणे हे निषेधार्य आहे. पण दारुच्या दुकानांची संख्या गेल्या काही वर्षात कित्येक पट्टीने वाढली आहे. किराणा दुकानावर सुद्धा दारु विक्रीचा विचार काही राज्य सरकारं करत आहेत. तर दारु पिण्याची वेळ शक्यतो संध्याकाळनंतरची मानली जाते. त्याला अनेक सन्मानिय अपवाद असू शकतात.

2 / 6
तर काही जण इतर देशात चिल्ड होण्यासाठी, जीवनाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी जातात. येथील खा प्या मजा करा ही संस्कृती त्यांना जवळीच वाटते. अनेक जण त्यासाठी थायलंड या देशात जातात. पण तिथूनच एक अशुभ वार्ता येऊन धडकली आहे.

3 / 6
 जर तुम्ही थायलंड जाण्याचा प्लॅन आखत असाल तर ही येथे दारु पिण्याविषयीच्या बदललेल्या नियमाविषयी जाणून घ्या. 8 नोव्हेंबरपासून हा नियम लागू झाला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक हिरमुसले आहेत. काय आहे हा नवीन नियम?

4 / 6
तर या नवीन नियमानुसार निर्बंध असलेल्या ठिकाणी आणि वेळेत जर तुम्ही दारु प्याल तर 10,000 Baht म्हणजेच 26 हजारांचा दंड भरावा लागेल. थायलंडने असा नियम लागू केल्याने पर्यटकांचा उत्साह मावळला आहे. बिझनेस टुडने ब्लूमबर्गच्या एका वृत्ताआधारे या नवीन नियमाची माहिती दिली आहे.

5 / 6
थायलंडमध्ये रिटेल शॉप आणि सुपरमार्केटमध्ये दुपारी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दारु विक्रीवर बंदी आहे. तर परवाना प्राप्त मनोरंजन स्थळे, हॉटेल वा इतर ठिकाणी या नियमाला बगल देण्यात आली आहे. पूर्वी निर्बंध असलेल्या ठिकाणी दारु विक्री झाली तरी कानाडोळा होत होता.

6 / 6
आता नवीन नियमामुळे रेस्टॉरंट मालक, हॉटेल चालक धास्तावले आहेत. कारण अनेक पर्यटक दुपारनंतर चिल्ड होतात. त्यांना थायलंडमध्ये मौजमज्जा करायची असते. पण या काळात जर दारु विक्री झाली तर दुकानदाराला नाही तर ग्राहकांना 26 हजारांचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे.