Drishyam 3 Box Office: विजय साळगावकरने कमालच केली..; फक्त 4 दिवसांत ‘दृश्यम 3’ने गाठला कमाईचा मोठा टप्पा
अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. विजय साळगावकरच्या या नव्या कहाणीने अवघ्या चार दिवसांत कमाईचा मोठा टप्पा गाठला आहे. भारतासह जगभरात सिनेमाची जोरदार कमाई सुरू असून, आकडे पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. नेमकी किती झाली कमाई? जाणून घ्या सविस्तर.

अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रिलीजनंतरच्या पहिल्या वीकेंडमध्ये भारतात 150 कोटींचा टप्पा ओलांडला, तर चार दिवसांत जागतिक कमाई 303 कोटींवर पोहोचली.
सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार सिनेमाने पहिल्या दिवशी 62 कोटी, दुसऱ्या दिवशी 53.50 कोटी आणि रविवारी 61 कोटींची कमाई केली. पहिल्या वीकेंडची एकूण कमाई 176.50 कोटी रुपये झाली.
चौथ्या दिवशी म्हणजे पहिल्या सोमवारी सिनेमाने 21 कोटींची कमाई केली. कमाईत थोडी घट झाली असली तरी आकडा अजूनही दुहेरी अंकात राहिला आहे. यामुळे चार दिवसांत भारतातील एकूण नेट कमाई 197.50 कोटींवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर सिनेमाने आतापर्यंत सुमारे ३०३ कोटींची कमाई केली आहे.
सिनेमाचे बजेट सुमारे 128 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. केवळ चार दिवसांतच सिनेमाने नफा कमवायला सुरुवात केली आहे.
फ्रँचायझीचा तिसरा भाग असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम आहे. अजय देवगणच्या या सिनेमाने अनेक मोठ्या चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले असून, पुढील आठवड्यातही त्याची दमदार कामगिरी सुरू राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.