AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्ख्या महाराष्ट्राला ‘याड’ लावणारी सैराटची विहीर पडली कोरडी; 61 वर्षांनंतर दुष्काळाचं भीषण वास्तव!

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील देवळाली येथील 'सैराट' चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली विहीर 61 वर्षांनंतर प्रथमच कोरडी पडली आहे. 1965 च्या दुष्काळात बांधलेली ही ऐतिहासिक विहीर आजच्या भीषण दुष्काळामुळे आटली आहे. कधीकाळी परिसरातील पिकांसह माणसे व जनावरांची तहान भागवणारी ही विहीर, आता मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता दाखवते.

अख्ख्या महाराष्ट्राला 'याड' लावणारी सैराटची विहीर पडली कोरडी; 61 वर्षांनंतर दुष्काळाचं भीषण वास्तव!
Sairat well driesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 3:06 PM
Share

शितलकुमार मोटे, प्रतिनिधी, टीव्ही9 मराठी : याड लागलं गं याड लागलं गं… रंगलं तुझ्यातं याड लागलं गं… वास ह्यो उसात येई कस्तूरीचा… चाखलंया वारं ग्वाड लागलं गं… ‘सैराट’मधील हे गाणं आठवतंय? या गाण्यातील ती तुडूंब भरलेली विहीर आठवतेय? आधी आर्ची, नंतर परश्याने मारलेला सूर आणि आर्चीच्या चेहऱ्यावरचे ते निरागस भाव? त्याच विहिरीच्या पायऱ्यावर दोघांची झालेली नजरा नजर… हो, तीच विहीर. जी 1965 मध्ये बांधण्यात आली होती. सर्वांची तहान भागवत होती. सोलापूरच्या करमाळ्यातली. तीच तुडूंब भरलेली ही विहीर आता आटली आहे. या विहिरीलाही दुष्काळाची झळ पोहोचली आहे. तब्बल 61 वर्षानंतर पहिल्यांदाच ही विहीर कोरडली पडली आहे. यावरून यंदाचा दुष्काळ किती भीषण आहे, हे दिसून येतंय.

करमाळा तालुक्यातील देवळाली येथील ‘सैराट’ चित्रपटामुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेली ऐतिहासिक विहीर यंदाच्या दुष्काळात पूर्णपणे कोरडी ठाक पडली आहे. 1965 च्या भीषण दुष्काळाच्या काळात बांधण्यात आलेल्या या विहिरीत प्रथमच पाणी नसल्याने परिसरातील दुष्काळाची तीव्रता समोर आली आहे. एकेकाळी शेतातील पिकांसह माणसे आणि जनावरांची तहान भागविणारी ही विहीर आज दुष्काळाच्या भयावह वास्तवाचे प्रतीक बनली आहे.

विहिरीने तळ गाठला

गेल्या अनेक दशकांपासून या विहिरीचा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आधार होता. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठीही या विहिरीचा उपयोग होत होता. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण आणि पाणी उपलब्धतेवर निर्माण झालेल्या संकटामुळे विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्यासाठी आता पर्यायी स्रोतांचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

अन् प्रकाशात आली…

दरम्यान, निर्माता-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटामुळे या विहिरीला राज्यभर प्रसिद्धी मिळाली होती. चित्रपटातील आर्ची आणि परश्याची पायऱ्यांवर झालेली नजरानजर तसेच विहिरीच्या कठड्यावरून उड्या मारून पोहण्याची दृश्ये याच ठिकाणी चित्रित करण्यात आली होती. चित्रपटाच्या लोकप्रियतेनंतर ही विहीर सिनेप्रेमींसाठी आकर्षणाचे ठिकाण बनली.

दुष्काळासाठी बांधली, दुष्काळामुळेच आटली

विशेष म्हणजे, 1965 च्या दुष्काळात उभारलेली ही विहीर आज पुन्हा दुष्काळाच्या विळख्यात सापडली आहे. पडद्यावर प्रेमकथेचा अविस्मरणीय प्रसंग जपणारी ही विहीर आज मात्र पाण्याअभावी कोरडी पडली आहे. एकेकाळी अनेकांची तहान भागविणाऱ्या या विहिरीची अवस्था पाहता यंदाच्या दुष्काळाची दाहकता किती गंभीर आहे, याची जाणीव होते.

Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर