Drishyam 3 House Tour: ‘दृश्यम’मधल्या विजय साळगावकरचं घर कुठे आहे? 100 वर्षे जुना बंगला आतून दिसतो असा

उकासैममधील या बंगल्याशिवाय गोव्यातील आणखी काही ठिकाणं ‘दृश्यम’मुळे प्रसिद्ध झाली. उकासैममधील एका जुन्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचा वापर गोवा पोलिस मुख्यालय म्हणून करण्यात आला होता.

| Updated on: Oct 08, 2026 | 4:13 PM
1 / 8
अजय देवगणच्या ‘दृश्यम’ फ्रँचायझीने प्रेक्षकांना केवळ रहस्य आणि थरार दिला नाही, तर या चित्रपटातील काही लोकेशन्सही प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली. यातील सर्वात महत्त्वाचं लोकेशन म्हणजे विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाचं घर.

अजय देवगणच्या ‘दृश्यम’ फ्रँचायझीने प्रेक्षकांना केवळ रहस्य आणि थरार दिला नाही, तर या चित्रपटातील काही लोकेशन्सही प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली. यातील सर्वात महत्त्वाचं लोकेशन म्हणजे विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाचं घर.

2 / 8

पडद्यावर अनेक रहस्यांचं साक्षीदार ठरलेलं हे घर प्रत्यक्षात कुठे आहे, याची उत्सुकता चाहत्यांना कायम होती. आता या घराचा व्हिडीओ आणि त्याच्या प्रत्यक्ष लोकेशनविषयीची माहिती पुन्हा चर्चेत आली आहे.

3 / 8

‘दृश्यम’मधील विजय साळगावकरचं घर उत्तर गोव्यातील उकासैम या गावात आहे. पणजीपासून हे ठिकाण साधारण 25 मिनिटांच्या अंतरावर आहे. शांत, हिरवाईने नटलेल्या परिसरात असलेला हा जुना बंगला चित्रपटातील घरापेक्षा प्रत्यक्षातही तितकाच आकर्षक दिसतो.

4 / 8

विशेष म्हणजे, हा बंगला सुमारे 100 वर्ष जुना आणि पोर्तुगीज शैलीतील असल्याचं सांगितलं जातं. जुन्या वास्तूची रचना, कमानीदार खिडक्या, लाल छप्पर आणि आजूबाजूची दाट हिरवाई यामुळे या घराला वेगळाच आकर्षक लूक मिळतो.

5 / 8

‘दृश्यम’च्या कथेत हे घर साधं दिसत असलं, तरी त्याच्या भिंतींमध्ये विजयच्या कुटुंबाची अनेक गुपितं दडलेली असल्याचं दाखवण्यात आलं आहे. घरातील वातावरणही तुलनेने उबदार आणि सुखी कुटुंबाचं आयुष्य दाखवणारं होतं. मात्र दुसऱ्या भागात कथानक अधिक गंभीर होत गेलं आणि घराच्या रंगसंगतीतही बदल दिसून आला.

6 / 8

या घराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ही खासगी मालमत्ता आहे. त्यामुळे सर्वसामान्य पर्यटकांना घराच्या आत मुक्तपणे प्रवेश मिळतोच असं नाही. हे घर एका 85 वर्षांच्या एका महिलेच्या देखरेखीखाली असल्याचं कळतंय.

7 / 8

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या घराला चाहत्यांनी 'दृश्यम मूव्ही हाऊस' असं नाव दिलं आहे. अनेक चाहते इथं पोहोचून घराबाहेर फोटो आणि व्हिडीओ शूट करताना दिसतात.

8 / 8

विशेष म्हणजे, ‘दृश्यम: द कन्क्लूजन’मध्येही याच उकासैममधील बंगल्याचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच तीनही भागांमध्ये विजय सालगांवकरच्या कुटुंबाचं घर म्हणून हीच वास्तू दिसली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us