
भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक अस व्यापार करार झाला आहे. या व्यापार करारामुळे दोन्ही देशांना फायदा होणार असल्याचा दावा केला जातोय. परंतु भारतातील काही काही घटकांत मात्र अस्वस्थता आहे.

भारत-अमेरिका व्यापार कराराअंतर्त अमेरिक व्हिस्की आणि वाईन यांची भारतात आयात वाढावी यासाठी आयात शुल्कात कपात केल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भारतातील व्हिस्की आणि वाईन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. ही चिंता किती योग्य आहे ते समजून घेऊ या.

भारताने अमेरिकेच्या वाईन आणि व्हिस्किीवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला तरीदेखील भारतीय व्हिस्की, वाईन उत्पादकांना फारसा फरक पडणार नाही. कारण भारतातील मद्यबाजारावर अजूनही भारतीय उत्पादकांचेच वर्चस्व आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार भारतात अमेरिकेन व्हिस्कीच्या विक्रीचे खूपच कमी आहे. आकड्यात सांगायचे झाल्यास 2.29 लाख केसेसच्या विक्रीसह अमेरिकन व्हिस्कीचे भारतीय व्हिस्की बाजारातील विक्रीचे प्रमाण 0.1 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. अमेरिकन व्हिस्कीच्या तुलनेत आयरीश व्हिस्कीच्या विक्रीचे प्रमाण 0.2 टक्के आहे.

वाईन सेगमेंटबाबत बोलायचे झाल्यास भारतात आयात केलेल्या वाईनच्या विक्रीचे प्रमाण फक्त 0.5 टक्के आहे. यातही आयात केलेल्या वाईनच्या विक्रीमध्ये ऑस्ट्रेलिया हा देश सर्वात पुढे आहे. भारतात वाईन विक्रीच्या बाजारात अमेरिकेची हिस्सेदारी खूपच कमी आहे. त्यामुळे भारताने अमेरिकन वाईन आणि व्हिस्कीवर आयात शुल्क कमी केले तरीदेखील त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे म्हटले जात आहे.