AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

video : पुणे तिथे काय उणे, आकाशातून पावसाच्या धारा, तरी टँकरने दुभाजकावरील झाडांना पाणी…

पुणे महानगरपालिकेच्या अजब कारभाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पुणे पालिकेचे कंत्राटदार भर पावसात कोथरूडमध्ये रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या झाडांना टँकरने पाणी घालत असल्याच्या व्हिडीओ ट्रोल होत आहे. यावरुन विरोधकांनी टीका केली आहे.

video : पुणे तिथे काय उणे, आकाशातून पावसाच्या धारा, तरी टँकरने दुभाजकावरील झाडांना पाणी...
pune tanker video viral
| Updated on: Jul 04, 2026 | 7:00 PM
Share

देशभरात आणि महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनचे आगमन झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील एका व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधले आहे. पुण्यातही जोरदार सरी बरसत असल्याने आता अनेक ठिकाणी पाणी तुंबले असताना हा व्हिडीओ हास्यास्पद ठरत आहे. हा व्हिडीओ पुणे महानगर पालिकेच्या कारभाराचा उत्तम नमूना असल्याचे म्हटले जात आहे.पुणे महानगरपालिकेचा अजब कारभारामुळे भर पावसात कोथरूडमध्ये रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या झाडांना टँकरने पाणी घातले जात असल्याचे या व्हिडीओत दिसत असल्याने हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत पुणे नगर पालिकेचा कर्मचारी आकाशातून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु असताना रस्त्याच्या दुभाजकावर लावलेल्या शोभेच्या झाडांना टँकरने पाणी देताना दिसत आहे. सर्वत्र पाऊस पडत असताना अशा प्रकारे झाडांना पाणी देणारे दृश्य पाहून पुणेकर तर हैराण झालेच परंतू सोशल मीडियावर हा व्हिडीओ यंत्रणेचा भ्रष्टाचार दाखवत आहे. जर आभाळातून धो..धो पाऊस पडत असताना अशा प्रकारे झाडांना स्वतंत्र पाणी देण्याची मुळात गरज काय ? असे साऱ्यांनाच वाटत असेल.

कोथरूडमध्ये रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या झाडांना पुणे महानगरपालिकेचे कंत्राटदार भर पावसात टँकरने पाणी देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरती ट्रोल केला जात आहे. यावरुन विरोधकांनी महानगरपालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. एकीकडे पुणे शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे आणि पुण्यामध्ये भर पावसात झाडांना पाणी घातले जाते हा कारभार नक्की कुणासाठी आहे. ही सडकीबुद्धी कोणाची ? पावसामध्ये पाणी घातले जात आहे. हे पुणेकरांना शोभणारे नाही. पावसामध्ये पाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असे शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी म्हटले आहे.

किती भ्रष्ट कारभार सुरू आहे

पावसात डिव्हायडर मधील झाडांना पाणी घातले जाते आणि त्याची बातमी टीव्ही वरती झळकली असून ही अत्यंत गंभीर बाब आहे.‌‌ महापालिका आयुक्तांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पुणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी केली आहे. जेव्हा पाणी घालायचं होतं, तेव्हा पाणी घातलं नाही ना आता पावसामध्ये पाणी घालत आहेत, हे खर्च दाखवण्यासाठी सर्व सुरू आहे. किती भ्रष्ट कारभार सुरू आहे अशी टीका उबाठाचे नेते चंदन साळुंखे यांनी केली आहे.

येथे व्हिडीओ पाहा –

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ