AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईठा रिलीज होणार की नाही? प्रचंड वादानंतर आता विठाबाईंचाच नातू आला समोर, म्हणाला, श्रद्धा कपूर… मोठी अपडेट काय?

'ईठा' सिनेमाच्या नावावरून सुरू असलेला वाद आता संपुष्टात आला आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित यांनी स्पष्ट केले की, निर्मात्यांनी 'ईठा' हे नाव ग्रामीण महाराष्ट्रात विठाबाईंना कसे ओळखले जाते, हे समजावून दिल्याने कुटुंबाची चिंता दूर झाली. कुटुंबाने आता चित्रपटाला पाठिंबा दर्शवला असून, लवकरच श्रद्धा कपूरसह 'ईठा' टीम नारायणगावात भेट देणार आहे.

ईठा रिलीज होणार की नाही? प्रचंड वादानंतर आता विठाबाईंचाच नातू आला समोर, म्हणाला, श्रद्धा कपूर... मोठी अपडेट काय?
ईठाImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 04, 2026 | 6:59 PM
Share

प्रदर्शित होण्यापूर्वीच ईठा हा सिनेमा वादात अडकला आहे. या सिनेमातील कंटेट, गाणी किंवा एखाद्या प्रसंगावरून हा सिनेमा वादात अडकलेला नाहीये. तर या सिनेमाच्या शीर्षकावरून हा सिनेमा वादात अडकला आहे. या सिनेमाला ईठा हे नाव देऊन तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा अपमान करण्यात आलाचा दावा आक्षेप घेणाऱ्यांनी केला आहे. तसेच या सिनेमाचं नाव बदलण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रदर्शित होणार की नाही? अशी शक्यता निर्माण झालेली असतानाच विठाबाई यांचे नातू मोहित विठाबाई नारायणगावकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मनमोकळं केलं आहे.

‘ईठा’ चित्रपटाच्या शीर्षकाबाबत सुरुवातीला निर्माण झालेल्या चिंतेवर मोहित विठाबाई नारायणगावकर यांनी स्पष्टीकरण दिले असून, निर्मात्यांनी दिलेल्या कारणामुळे कुटुंबाच्या शंका दूर झाल्याचे मोहित यांनी स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना विठाबाई नारायणगावकर यांचे नातू म्हणाले, “आमचीही या चित्रपटाच्या शीर्षकाबाबत चिंता होती. आम्ही विनंती केली होती की चित्रपटाचे नाव ‘ईठा’ ऐवजी ‘विठाबाई नारायणगावकर’ असावे. पण निर्माते आणि दिग्दर्शकांनी आम्हाला समजावून सांगितले आणि त्यांचे म्हणणे पटण्यासारखे होते. त्यांनी सांगितले की, ग्रामीण महाराष्ट्रात लोक अजूनही विठाबाईंना ‘ईठा’ म्हणूनच ओळखतात. हे ऐकल्यानंतर आमच्या शंका दूर झाल्या.” मोहित यांनी सांगितले की, या स्पष्टीकरणामुळे कुटुंबाचे समाधान झाले असून, ग्रामीण महाराष्ट्र आणि त्याची सांस्कृतिक मुळे प्रामाणिकपणे पडद्यावर मांडल्याबद्दल त्यांनी चित्रपट निर्मात्यांचे कौतुक केले.

टीम गावात येणार

“चित्रपट अतिशय सुंदर बनवला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक म्हणतील, ‘तुम्ही खरोखरच तमाशा परंपरा आणि मराठी संस्कृतीचे वारसदार आहात.’ मला विश्वास आहे की प्रेक्षक हा चित्रपट मनापासून स्वीकारतील,” असे मोहित म्हणाले. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी नारायणगाव येथे मोठा उत्साह असल्याचेही त्यांनी सांगितले. मोहित यांच्या माहितीनुसार, श्रद्धा कपूरसह ‘ईठा’ चित्रपटाचे कलाकार आणि टीम चित्रपट प्रदर्शित होण्याआधी गावाला भेट देणार आहेत. मोहित यांनी सांगितले की चित्रपटाची अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि ‘ईठा’ची संपूर्ण टीम नारायणगावला येणार आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा