AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio Airtel : जिओसह एअरटेलच्या ग्राहकांची झोप उडवणारी बातमी, तब्बल इतक्या रूपयांनी रिचार्ज महागणार?

Jio And Airtel Recharge : जिओ आणि एअरटेल या कंपन्यांच्या ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. या दोन्ही कंपन्या लवकरच आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

Jio Airtel : जिओसह एअरटेलच्या ग्राहकांची झोप उडवणारी बातमी, तब्बल इतक्या रूपयांनी रिचार्ज महागणार?
jio and airtel recharge price hikeImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jul 04, 2026 | 7:11 PM
Share

जिओ आणि एअरटेल या भारतातील सर्वाधिक ग्राहक असणाऱ्या कंपन्या आहेत. दोन्ही कंपन्यांचे मिळून 90 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. आता या कंपन्यांच्या ग्राहकांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. या दोन्ही कंपन्या लवकरच आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत ही दरवाढ जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडू शकतो. कारण मोबाईल रिचार्जसाठी आता अधिक पैसे मोजावे लागू शकतात. ऐन महागाईच्या काळात ही दरवाढ होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

15 ते 20 टक्क्यांपर्यंत रिचार्ज महागणार

टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार जिओ आणि एअरटेल आपल्या मोबाईल रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे. जर ही दरवाढ लागू झाली तर ग्राहकांसाठी मोबाईल सेवा वापरणे आणखी महाग होणार आहे. कारण यापूर्वीही या कंपन्यांनी अनेकदा रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा किमती वाढल्यास ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

अद्याप अधिकृत घोषणा नाही

महत्त्वाची बाब म्हणजे दोनही कंपन्यांकडून अद्याप दरवाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, स्मार्टफोनच्या किमती वाढल्यानंतर आता रिचार्ज प्लॅन्सही महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेमरी चिपच्या तुटवड्यामुळे स्मार्टफोनच्या किंमती आधीच वाढल्या असून, आता रिचार्ज प्लॅन्सच्या संभाव्य दरवाढीमुळे ग्राहकांवर दुहेरी आर्थिक भार पडू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे काही कंपन्या रिचार्जची किमती वाढवत नाहीत, मात्र संबिधित प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली जातो.

नेटवर्कच्या तक्रारी वाढल्या

देशाच्या अनेक भागात आजही चांगल्या प्रकारे नेटवर्क उपलब्ध होत नाही, त्यामुळे नेटवर्कच्या गुणवत्तेबाबत ग्राहकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. ग्राहकांकडून कॉल ड्रॉप, कमी इंटरनेट स्पीड आणि नेटवर्क समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र या समस्या कायम असताना पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅन्स महाग होण्याची शक्यता आहे. याचा फटका थेट ग्राहकांना बसणार आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा