Vastu Tips : काहीही केलं तरी घरात पैसा टिकत नाहीये? मग या चुका लगेच करा दुरुस्त

कितीही कष्ट केले तरी घरात लक्ष्मी टिकत नाही, अस अनेकदा होते. यामागे वास्तूदोष हे कारण असू शकते. त्यामुळे वास्तूशास्त्राचे नियम माहिती असणे गरजेचे आहे.

| Updated on: Jan 27, 2026 | 9:29 PM
1 / 5
अनेकदा तुम्ही दिवसरात्र मेहनत करता परंतु तुमच्या हातात पैसे टिकत नाहीत. एकदा हातात आलेला पगार संपायला वेळ नाही. परिणामी कितीही कष्ट केले तरी तुमच्याकडे पैशांची चणचण कायमच असते. अशा स्थितीत तुमच्या वास्तूत दोष असू शकतो. वास्तूशास्त्रानुसार हे दोष दूर करता येऊ शकतात.

अनेकदा तुम्ही दिवसरात्र मेहनत करता परंतु तुमच्या हातात पैसे टिकत नाहीत. एकदा हातात आलेला पगार संपायला वेळ नाही. परिणामी कितीही कष्ट केले तरी तुमच्याकडे पैशांची चणचण कायमच असते. अशा स्थितीत तुमच्या वास्तूत दोष असू शकतो. वास्तूशास्त्रानुसार हे दोष दूर करता येऊ शकतात.

2 / 5

वास्तूशास्त्रात उत्तर पूर्ण दिशा ही लक्ष्मी मातेची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला टॉयलेट, चप्पल बूट, कचरा ठेवत असाल तर लगेच या वस्तूंची जागा बदला. यामुळे तुमच्या घरात येणाऱ्या धनशक्तीचा प्रवाह थांबतो. या भागात तुळस, मनी प्लांट ठेवावी. यामुळे भविष्यात तुमच्या हातात पैसा कायम राहू शकतो.

3 / 5

घराचे मुख्य द्वार सकारात्मक उर्जेचे प्रवेशद्वार असते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घाण असेल, जाळे असेल तर ते लगेच काढावेत. मुख्य प्रवेशद्वार साफ करावे. तसेच मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वास्तीक काढावे किंवा ओम काढावा. यामुळे तुमच्या घरात सकारात्मक उर्जा यायला लागेल आणि भविष्यात धनसंपत्ती कमी पडणार नाही.

4 / 5

घरात तिजोरी चुकीच्या दिशेने असेल तर माता लक्ष्मी नाराज होते आणि पैसे टिकत नाहीत. त्यामुळे वास्तूशास्त्राच्या नियमानुसार तिजोरी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. तिजोरीच्या पुढे आरसा कधीच नसावा. तिजोरीत श्री यंत्र ठेवावे. यामुळे घरातील लक्ष्मी घरातच राहील.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us